esakal | सेहवागचे धोनीवर गंभीर आरोप, म्हणाला...
sakal

बोलून बातमी शोधा

Virender Sehwag

आमच्यावेळी संघातील वरिष्ठ खेळाडू व कर्णधार गांगुलीसारखा खेळाडूंशी जाऊन चर्चा करत असे. मात्र, धोनी कधीही अंतिम संघाबाहेर बसाव्या लागलेल्या खेळाडूंशी चर्चा करत नव्हता. ऑस्ट्रेलिया दौऱ्यात मी, सचिन आणि गंभीर हे तिघे क्षेत्ररक्षणासाठी चपळ नसल्याचे धोनीने माध्यमांमध्ये दिलेल्या माहितीनंतर समजले.

सेहवागचे धोनीवर गंभीर आरोप, म्हणाला...

sakal_logo
By
वृत्तसंस्था

नवी दिल्ली : भारताचा माजी सलामीवीर वीरेंद्र सेहवागने यष्टीरक्षक व माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनीवर गंभीर आरोप केले असून, त्याच्या नेतृत्वावरच प्रश्न उपस्थित केले आहेत. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

एका कार्यक्रमात बोलताना सेहवागने धोनीला लक्ष्य केले आहे. न्यूझीलंड दौऱ्यावर सध्या भारतीय संघ असून, यष्टीरक्षक रिषभ पंतला एकही सामन्यात संधी न मिळाल्याने सेहवागने नुकतीच टीका केली होती. आता त्याने संघ निवडीवरून धोनीच्या नेतृत्वावरच प्रश्न उपस्थि केले आहेत. 

सेहवाग म्हणाला, की आमच्यावेळी संघातील वरिष्ठ खेळाडू व कर्णधार गांगुलीसारखा खेळाडूंशी जाऊन चर्चा करत असे. मात्र, धोनी कधीही अंतिम संघाबाहेर बसाव्या लागलेल्या खेळाडूंशी चर्चा करत नव्हता. ऑस्ट्रेलिया दौऱ्यात मी, सचिन आणि गंभीर हे तिघे क्षेत्ररक्षणासाठी चपळ नसल्याचे धोनीने माध्यमांमध्ये दिलेल्या माहितीनंतर समजले. संघाच्या बैठकीत त्याने कधीही आम्हाला असे म्हटले नव्हतो. धोनी कधीही खेळाडूंशी येऊन बोलत नव्हता. आता विराट काय करतो, याबद्दल मला माहिती नाही. रोहित शर्मा जेव्हा आशिया करंडकात कर्णधार होता, तेव्हा तो खेळाडूंशी बोलत होता. रिषभला संघाबाहेर बसविणे चुकीचे आहे. त्याला संधीच नाही मिळाली तर तो धावा कशा करणार. तो एक मॅचविनर असून, त्याला संधी दिली पाहिजे.