World Cup Team India: 'खिचडी खाऊन धोनीने जिंकला वर्ल्डकप' सेहवागने सांगितली 2011 मधील यशाची अंधश्रद्धा

 MS Dhoni  2011 World Cup Virender Sehwag
MS Dhoni 2011 World Cup Virender Sehwag
Updated on

MS Dhoni Virender Sehwag : वानखेडे स्टेडियमवर २०११ मध्ये महेंद्रसिंग धोनीने मारलेला तो षटकार आणि त्यानंतर देशभर झालेला जल्लोष अनेकांनी याची देही याची डोळा अनुभवलेला आहे. या अभूतपूर्व यशाच्या अनेक कहाण्या सांगण्यात आल्या आहेत, परंतु वीरेंद्र सेहवागने कधी जाहीर न झालेले गुपित आज जाहीर केले. संपूर्ण स्पर्धेत आम्ही सर्व जण कोणती ना कोणती अंधश्रद्धा बाळगून होतो. कर्णधार धोनीसाठी तर खिचडी आणि संघाचा विजय हीच अंधश्रद्धा होती, अशी माहिती सेहवागने उघड केली.

 MS Dhoni  2011 World Cup Virender Sehwag
Ire vs Ind series : आयर्लंड दौऱ्याचं वेळापत्रक जाहीर, टीम इंडिया ऑगस्टमध्ये टी-20 अन्..., पाहा वेळापत्रक

सेहवाग म्हणाला, २०११ मधील ही विश्वकरंडक स्पर्धा आम्हा खेळाडूंसाठीच नव्हे, तर प्रत्येक भारतीयासाठी प्रतिष्ठेची झाली होती. जो जो आम्हाला भेटत होता तो प्रत्येक जण वर्ल्डकप कसाही जिंका असेच सांगत होता, पण तोपर्यंत यजमान देश कधीही वर्ल्डकप जिंकलेला नाही मग हे त्या वेळी कसे शक्य होईल अशी धाकधुक आम्हाला होती.

आम्ही प्रत्येक जण आपापल्या पद्धतीने अंधश्रद्धा बागळत होतो. धोनीसाठी खिचडी हीच अंधश्रद्धा होती. अंतिम सामन्यापर्यंत त्याच्याकडून धावा झाल्या नाहीत, परंतु संघाचा विजय मात्र होत होता. खिचडी आणि विजय असं समीकरण तयार झाल्यामुळे धोनीने संपूर्ण स्पर्धेत खिचडीच खाल्ली, असे सेहवागने सांगितले.

 MS Dhoni  2011 World Cup Virender Sehwag
World Cup 2023 schedule: डे-नाईटच्या सामन्यांच्या वेळेत बदल, जाणून घ्या काय आहे टायमिंग

विश्वकरंडक स्पर्धेचे वेळापत्रक जाहीर करण्यासाठी मुंबईत झालेल्या कार्यक्रमात सेहवाग आणि श्रीलंकेचा मुथय्या मुरलीधरन उपस्थित होते. त्या वेळी सेहवागने आपल्या स्वभावाप्रमाणे शाब्दिक फटकेबाजी केली.

१९९२ मध्ये आपण क्रिकेट पाहायला सुरुवात केली. सचिन तेंडुलकरला पाहण्यासाठी मी विश्वकरंडक स्पर्धा पाहायला लागलो. त्या वेळी माझ्या घरी केबलही नव्हती, त्यामुळे शेजाऱ्यांकडे जाऊन मी ती स्पर्धा पाहिली होती. सर्व देशांविरुद्ध सामने खेळायला मिळणाऱ्या अशा विश्वकरंडक स्पर्धेत खेळायची संधी आपल्यालाही मिळायला हवी. त्यामुळे माझ्यासाठी वर्ल्डकप ही ऑलिंपिकसारखी आहे, असे सेहवाग म्हणतो.

 MS Dhoni  2011 World Cup Virender Sehwag
Virender Sehwag : आम्ही सचिनसाठी खेळलो तुम्ही... आयसीसीच्या कार्यक्रमात सेहवाग काय म्हणाला?

सेहवाग म्हणतो...

भारत, ऑस्ट्रेलिया, पाकिस्तान, इंग्लंड उपांत्य फेरी गाठतील द्विराष्ट्रीय मालिकांत कितीही धावा करा, परंतु वर्ल्डकपमधील धावा आणि विकेट अनंतकाळ लक्षात राहतात धोनीचा ‘तो’ षटकार, कपिलदेव यांच्या १७५ धावा कोणीच विसरू शकत नाही. ऑलिंपिकपर्यंत खेळाडू माहिती नसतात, पण पदक जिंकल्यावर तो खेळाडू हिरो होतो. २०११ चा वर्ल्डकप जिंकला तेव्हा सर्व देशवासीय रस्त्यावर होते. वानखेडे ते आमचे हॉटेल यातील अंतर पाच मिनिटांचे, पण त्या दिवशी आम्हाला दीड तास लागला एवढे लोक जल्लोष करत होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com