INDvsWI : धोनीचा निर्णय झाला; विंडीज दौऱ्यातून माघार

वृत्तसंस्था
शनिवार, 20 जुलै 2019

भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनीने अखेर वेस्ट इंडीजविरुद्ध होणाऱ्या दौऱ्यातून माघार घेतली आहे. विश्वकरंडकात त्याच्या हाताला झालेल्या दुखापतीमुळे त्याने ही माघार घेतली आहे. त्याशिवाय त्याच्या भविष्याबाबतही तो आता विचार करण्याची शक्यता आहे. 

नवी दिल्ली : भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनीने अखेर वेस्ट इंडीजविरुद्ध होणाऱ्या दौऱ्यातून माघार घेतली आहे. विश्वकरंडकात त्याच्या हाताला झालेल्या दुखापतीमुळे त्याने ही माघार घेतली आहे. त्याशिवाय त्याच्या भविष्याबाबतही तो आता विचार करण्याची शक्यता आहे. 

विश्‍वकरंडक स्पर्धेमध्ये भारताला गाशा गुंडाळावा लागल्यानंतर माजी कर्णधार आणि भरवशाचा यष्टिरक्षक महेंद्रसिंह धोनीच्या निवृत्तीबाबत सर्वत्र चर्चा सुरू आहेत. त्या पार्श्‍वभूमीवर भारताच्या आगामी वेस्ट इंडिज दौऱ्याच्या संघामध्ये धोनी असणार का, याची उत्सुकता आता ताणली गेली होती. आता त्याने विंडीज दौऱ्यातून माघार घेत असल्याचे स्पष्ट केले आहे. 

त्याच्या माघार घेण्याचे कारण काहीही असले तरीही आता यामुळे त्याच्या निवृत्तीच्या चर्चांना अधिक उधाण येणार हे स्पष्ट आहे. धोनीने कसोटीमधून यापूर्वीच निवृत्ती घेतली आहे. वेस्ट इंडिजच्या तीन ट्‌वेंटी-20, तीन एकदिवसीय सामने आणि दोन कसोटी सामने खेळणार आहे. 

या दौऱयासाठी भारतीय संघाची निवड रविवारी (ता.21) केली जाणार आहे. आता धोनीच्याऐवजी संघात यष्टीरक्षक म्हणून रिषभ पंतला संधी मिळते की आणखी कोणाला हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: MS Dhoni out of west Indies tour