MS Dhoni Ram Mandir : धोनी देखील अयोध्येला जाणार...? राम मंदिर प्राण प्रतिष्ठा सोहळ्याचं पोहचलं आमंत्रण

महेंद्रसिंह धोनीच्या घरी, रांचीमध्ये पोहचलं राम मंदिर प्राण प्रतिष्ठा सोहळ्याचं आमंत्रण
MS Dhoni Ram Mandir
MS Dhoni Ram Mandir esakal

MS Dhoni Ram Mandir : भारताला दोन वर्ल्डकप जिंकून देणाऱ्या महेंद्रसिंह धोनीला अयोध्येतील राम मंदिराच्या प्राण प्रतिष्ठा सोहळ्याचं आमंत्रण पोहचलं आहे. हा सोहळा अयोध्येत 22 जानेवारीला होणार आहे. धोनीबरोबरच विराट कोहली, हरभजन सिंग, सचिन तेंडुलकर यांना देखील भव्य राम मंदिराच्या उद्घाटन सोहळ्याचं आमंत्रण मिळालं आहे. आज (दि. 15) महेंद्रसिंह धोनीला त्याच्या घरी रांचीमध्ये हे आमंत्रण मिळालं आहे.

MS Dhoni Ram Mandir
Australian Open 2024 : नाओमी ओसाका तब्बल 15 महिन्यांनी परतली मात्र पहिल्याच फेरीत बसला धक्का

एमएस धोनीला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सह-प्रांत सचिव धनंजय सिंह यांच्याकडून निमंत्रण मिळाले. अयोध्येत 22 जानेवारीला होणार्‍या राम मंदिरातील प्रभू श्रीरामांच्या प्राण प्रतिष्ठा सोहळ्यासाठी धोनीला औपचारिक निमंत्रण देण्यात आले. तेव्हा भाजपचे राज्य संघटनेचे सरचिटणीस कर्मवीर सिंग देखील उपस्थित होते.

श्री रामजन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टने देशातील 6000 हून अधिक लोकांना आमंत्रणे पाठवली आहेत. 22 जानेवारी रोजी होणाऱ्या राम मंदिर उद्घाटन सोहळ्याला विविध क्षेत्रातील अनेक सेलिब्रेटी उपस्थित राहण्याची शक्यता आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदीही या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत.

MS Dhoni Ram Mandir
Virat Kohli Aggression : ...हे मला चाहता म्हणून आवडणार नाही; विराटची आक्रमक फलंदाजी माजी खेळाडूला रूचली नाही

अयोध्येतील राम मंदिरातील प्रभू श्री रामांच्या मुर्तीची प्राण प्रतिष्ठा सोहळ्यासाठी राजकारणापासून ते सेलिब्रेटींपर्यंत सर्वांना आमंत्रणे पाठवण्यात आली आहे. 22 जानेवारीला होणाऱ्या कार्यक्रमांची जय्यत तयारी सुरू असून हा कार्यक्रम भव्य दिव्य करण्यासाठी सर्वांनी कंबर कसली आहे. आता निमंत्रितांपैकी या सोहळ्याला कोण कोण उपस्थिती राहतं ते पाहणं उत्सुकतेचं असेल.

(Sports Latest News)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com