धोनी म्हणतो, जर मी माझ्या शाळेसाठी क्रिकेट खेळलो नसतो तर...

भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीने तिरुवल्लूर जिल्हा क्रिकेट असोसिएशन (TDCA) च्या रौप्य महोत्सवी समारंभात हजेरी लावली होती.
MS Dhoni
MS Dhoniesakal

भारताचा माजी कर्णधार आणि चेन्नई सुपर किंग्जचा कर्णधार महेंद्रसिंग धोनीने तिरुवल्लूर जिल्हा क्रिकेट असोसिएशन (TDCA) च्या रौप्य महोत्सवी समारंभात हजेरी लावली होती. यावेळी त्याने, क्रिकेटपटूंना त्यांच्या जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करताना अभिमान वाटला पाहिजे असं वक्तव्य केलं. तसेच, स्वतःच्या यशासंदर्भातही त्याने भाष्य केलं.

MS Dhoni
महेंद्र सिंह धोनीसारखाच पांड्यादेखील थंड डोक्याचा कॅप्टन: ब्रेड हॉग

समारंभादरम्यान धोनीने भाषण केलं. 'जिल्हा संघटनेच्या यशानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या उत्सवाचा मी पहिल्यांदाच भाग घेत आहे. मी माझ्या जिल्हा क्रिकेट संघटनेचे (रांची) आभारही मानू इच्छितो. क्रिकेटपटूंना त्यांच्या जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करताना अभिमान वाटला पाहिजे.'' अशी भावना धोनीने यावेळी व्यक्त केली.

MS Dhoni
किती खोलवर जखम...मुंबई इंडियन्ससाठी Pollard ची इमोशनल पोस्ट

तसेच, त्याने त्याच्या क्रिकेटबद्दलही वक्तव्य केलं. ''मला माझ्या देशाचे प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळाली याचा मला अभिमान आहे. पण मी माझ्या जिल्ह्यासाठी किंवा शाळेसाठी खेळलो नसतो तर हे शक्य झाले नसते.'' असं वक्तव्य धोनीने यावेळी केलं.

25 वर्षे पूर्ण केल्याबद्दल धोनीने तिरुवल्लर जिल्हा क्रिकेट संघटनेचेही कौतुक केले. या जिल्ह्यातून अनेक क्रिकेटपटू उदयास आले आहेत, ज्यांनी देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर चांगली कामगिरी केली आहे.

या कार्याक्रमाला धोनीसोबत आयसीसीचे माजी अध्यक्ष आणि बीसीसीआयचे माजी अध्यक्ष एन श्रीनिवासन उपस्थित होते.

झारखंडचा धोनी पद्म भूषण, पद्म श्री आणि मेजर ध्यान चंद खेल रत्न पुरस्काराने सन्मानित आहे. तो टीम इंडियाचा माजी कर्णधार राहिला आहे. भारताच्या यशस्वी कर्णधारामध्ये त्याच्या नावाची गणना केली जाते. धोनीने कर्णधार काळात 2007 आयसीसी टी-20, 2007-08 कॉमनवेल्थ बँक सीरीज , 2011 क्रिकेट विश्व कप, आयसीसी चॅम्पियन ट्रॉफी 2013 आणि बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी आपल्या नावावर केली आहे. क्रिकेट करिअरमध्ये धोनीच्या नावावर अनेक विक्रम आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com