कडकनाथ कोंबड ते 40 रुपयांमध्ये डॉक्टर, पाहा धोनीचा देशी अंदाज | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

MS Dhoni set for organic poultry farming orders black Kadaknath chickens

कडकनाथ कोंबड ते 40 रुपयांमध्ये डॉक्टर, पाहा धोनीचा देशी अंदाज

माजी कर्णधार एमएस धोनीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली असली तरी धोनीची लोकप्रियता अजूनही कायम राहिली आहे. त्याच्या विक्रमामुळे, मैदानावरचा संयमी अंदाज आणि कर्णधार असताना प्राप्त केलेलं यश यामुळे चाहते त्याच्यासाठी वेडे आहेत. धोनी जरी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त झाला आहे, तरी तो कमाईत भल्या भल्यांना मागे टाकतो. मात्र, त्याला कोणत्याही गोष्टीचा गर्व नाही.

हेही वाचा: तब्बल दोन वर्षांनी विराटच्या 'त्या' ट्विटला बेस्ट फ्रेंड एबीचे उत्तर

काही दिवसांपूर्वीच धोनीबद्दल एक गोष्ट व्हायरल झाली होती. त्यामध्ये तो त्याच्या गुडघेदुखीवर केवळ 40 रुपयांमध्ये औषध घेतो. धोनी रांची येथील वैद्य बंधनसिंग खरवार नावाच्या आयुर्वेदिक डॉक्टरकडे गुडघेदुखीवरील औषध घेतो. लापुंग येथील देशी गाईचे दूध, झाडाची साल आणि अनेक वनौषधींपासून बनवलेले औषध धोनी पीत आहे.

धोनी सेंद्रिय शेती आणि कुक्कुटपालनचाही व्यवसाय करतो. कुक्कुटपालन मध्ये 2000 काळ्या कडकनाथ कोंबडीचा एक तुकडा मागवून पोल्ट्री व्यवसाय सुरू केला आणि आता भाजीपाला निर्यातीसाठी बाजारपेठेत प्रवेश देखील त्याने निवृत्तीनंतर केला. रांची येथील आपल्या फार्महाऊसमध्ये सुमारे 10 एकर जागेवर कोबी, टोमॅटो, स्ट्रॉबेरी, मटार आणि इतर बरीच भाजीपाला पिकवत आहे. या शेतातील कोबी आणि टोमॅटोला स्थानिक बाजारात मोठी मागणी असल्याचे सांगितले जात आहे.

हेही वाचा: IND vs ENG Day 3 LIVE: पावसामुळे खेळ थांबला, इंग्लंड 200 वर 6 बाद

धोनीने त्याच्या कारकिर्दीत ९० कसोटी सामने, ३५० एकदिवसीय सामने, ९८ टी-२० आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. कसोटी सामन्यात त्याने ६ शतक आणि ३३ अर्धशतकांसह ४८७६ धावा केल्या. तसेच एकदिवसीय सामन्यात १० शतक आणि ७३ अर्धशतकांसह १०७७३ धावा केल्या. टी-२० आंतरराष्ट्रीय मध्ये त्याने एकूण १६१७ धावा केल्या. धोनीने एकदिवसीय सामन्यात वेस्ट इंडीजच्या ट्रेव्हिस डॉलिनची (Trevis Dowlin) विकेट घेतली जी त्याची आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधली एकमेव विकेट आहे.

Web Title: Ms Dhoni Set For Organic Poultry Farming Orders Black Kadaknath Chickens

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..