virat kohli twitter post ab de villiers after two years reply
virat kohli twitter post ab de villiers after two years replysakal

तब्बल दोन वर्षांनी विराटच्या 'त्या' ट्विटला बेस्ट फ्रेंड एबीचे उत्तर

आरसीबीचा माजी फलंदाज एबी डिव्हिलियर्सने तब्बल दोन वर्षानंतर विराटला उत्तर दिले आहे

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये विराट कोहलीचा आजूनही वाईट टप्पा सुरूच आहे. इंग्लंडविरुद्धच्या कसोटी सामन्याच्या पहिल्या डावातही कोहली फार काही करू शकला नाही आणि अवघ्या 11 धावा करून बाद झाला. इंग्लंडचा युवा वेगवान गोलंदाज मॅटी पॉट्सने त्याला बोल्ड केले. या डावातही विराट आऊट होण्यापूर्वीपर्यंत चांगल्या लयीत दिसत होता, पण अचानक त्याची लय तुटली आणि तो आऊट झाला. विराट कोहलीने रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा कर्णधार असताना त्याच्या ट्विटर अकाऊंटवर एक फोटो पोस्ट केला होता. या फोटोवर आता आरसीबीचा माजी फलंदाज एबी डिव्हिलियर्सने तब्बल दोन वर्षानंतर मजेशीर प्रतिक्रिया दिला आहे. (virat kohli twitter post ab de villiers after two years reply)

virat kohli twitter post ab de villiers after two years reply
टीम इंडियासाठी दिलासादायक बातमी; रोहितची कोरोना चाचणी निगेटिव्ह

विराट कोहलीने दोन वर्षांपूर्वी त्याच्या ट्विटर अकाऊंटवर एक फोटो पोस्ट केला होता. या फोटोसोबत विराट कोहलीने एक मजेशीर कॅप्शनही लिहिले आहे. या फोटोमध्ये विराटसोबत एबी डिव्हिलियर्स, मोहम्मद सिराज आणि देवदत्त पडिक्कल आपल्याला दिसत आहेत. विराटने फोटो पोस्ट करत लिहिले होते की, हा फोटो मला शाळेच्या दिवसांची आठवण करून देतो. एकाच वर्गातील 4 मुले, एबी हा असा मुलगा ज्याचा गृहपाठ पूर्ण झाला आहे. इतर 3 लोकांना माहित आहे की ते अडचणीत आहेत. या फोटोमध्ये डिव्हिलियर्सच्या चेहऱ्यावर हसू आहे, तर विराटसह बाकीचे खेळाडू अतिशय उदास दिसत आहेत.

विराटच्या या पोस्टवर प्रतिक्रिया देताना एबी डिव्हिलियर्सने लिहिले की, मी आणि सिराजने होमवर्क केला आहे. ही पोस्ट आता व्हायरल होत आहे, ज्यावर आतापर्यंत 26 हजारांहून अधिक लाईक्स आले आहेत, तर 1400 हून अधिक लोकांनी रिट्विट केले आहे. हा फोटो यूएईमध्ये आयपीएलच्या 13व्या हंगामापूर्वी आरसीबीच्या कॅम्प मधला आहे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com