धोनी आजपासून देणार 19 किलो वजन घेऊन काश्मिरात पहारा

वृत्तसंस्था
बुधवार, 31 जुलै 2019

- काश्मिरमध्ये घालणार 15 ऑगस्टपर्यंत गस्त
19 किलोचं वजन घेऊन देणार पहारा
बादामी बाग कँट विभागात 8-10 सैनिकांसोबत देणार पहारा​

श्रीनगर : भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनी आजपासून काश्मिरमध्ये लेफ्टनंट कर्नल म्हणून रुजू होणार आहे. त्याने विंडीज दौऱ्यातून माघार घेत दोन महिन्यांसाठी लष्करात सेवा करण्याची इच्छा व्यक्त केली होती. ज्याला बीसीसीआय आणि लष्कराने परवानगी दिली आहे. 

धोनी 31 जुलै तो 15 ऑगस्ट या कालावधीत काश्मीर खोऱ्यात व्हिक्टर फोर्ससोबत पेट्रोलिंग करणार आहे. या विभागात धोनी 19 किलोचं वजन घेऊन पहारा देणार आहे.

धोनी ज्या बटालियनमध्ये सहभागी होऊन पहारा देणार आहे, ती बटालियन विशेष सैनिकांची आहे. यात देशातील प्रत्येक विभागातून आलेले सैनिक आहेत. धोनीला येथे दिवस आणि रात्र अशा शिफ्टमध्ये काम करावे लागणार आहे. यावेळी धोनीकडे पाच किलो वजनाच्या 3 मॅग्जीन, 3 किलोचा पोशाख, 2 किलोचे बूट, 4 किलोचे 3 ते 6 ग्रेनेड, 1 किलोचे हॅल्मेट आणि 4 किलोचे बुलेटप्रुफ जॅकेट असे एकूण 19 किलो वजन असणार आहे.

नगर येथील बादामी बाग कँट विभागात धोनी 8-10 सैनिकांसोबत पहारा देणार आहे. यावेळी त्याला एके-47 रायफल आणि 6 ग्रेनेड व बुलेटप्रुफ जॅकेट देणार आहे. धोनी गार्ड यूनिटमध्येही रक्षकाचे काम पाहणार आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: MS Dhoni to start serving nation from today in Kashmir