VIDEO : ही तर चोरी आहे; धोनी असं साक्षीला का म्हणाला? | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

MS Dhoni Sweet Argument Wife Sakshi

VIDEO : ही तर चोरी आहे; धोनी असं साक्षीला का म्हणाला?

MS Dhoni Wife Sakshi Video : भारताचा माजी कर्णधार महेंद्र सिंह धोनी हा आयपीएल 2022 नंतर फारसा कुठे दिसलेला नाही. मात्र आता त्याचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओत महेंद्रसिह धोनी आणि पत्नी साक्षी यांच्यात एक वादविवाद झालेला दाखवण्यात आला आहे. मात्र हा वादविवाद लुटूपुटूचा होता. साक्षी धोनी म्हणते की तुझे फॉलोअर्स माझ्यावर देखील प्रेम करतात.

हेही वाचा: Prithvi Shaw : शॉचा धुमधडाका! कसोटीत T20 च्या स्ट्राईक रेटने शतकी खेळी

महेंद्रसिंह धोनी आणि साक्षी धोनीचा हा लुटूपुटूच्या लाढाईचा व्हिडिओ धोनीच्या अधिकृत फॅन पेजवरून शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओवर अनेक चाहत्यांनी कमेंट केल्या आहेत. तसेही महेंद्रसिंह धोनीचा सोशल मीडियावरील वावर हा अत्यंत मर्यादित असतो. त्यामुळे सोशल मीडियावर त्याची एक झलक पाहण्यासाठी चाहत्यांची झुंबड उडत असते.

आताच्या या व्हिडिओत धोनी साक्षीला म्हणतो की तू हे जे करत आहेस ते सर्व तुझे फॉलोअर्स वाढवण्यासाठी करत आहेस. ही चोरी आहे.' यावर साक्षी धोनी प्रत्युत्तर देते की 'तुझे फॉलोअर्स माझ्यावर देखील प्रेम करतात. मी तुझा एक अविभाज्य घटक आहे बेबी.. स्विटी.'

हेही वाचा: Impact Player Rule: BCCI नियम बदलणार; सामन्यात आता 11 चा नाही तर 15 चा संघ?

महेंद्रसिह धोनी पुन्हा एकदा सीएसकेचा कर्णधार झाला आहे. तो 2023 च्या हंगामात देखील सीएसकेचा कर्णधार असणार आहे. धोनीने 350 वनडे, 98 आंतरराष्ट्रीय टी 20 आणि 90 कसोटी सामने खेळले आहेत. त्याने एकूण 17 हजार 266 धावा केल्या असून यात 108 अर्धशतके आणि 16 शतके ठोकली आहेत.

Web Title: Ms Dhoni Sweet Argument Wife Sakshi Over Increase Instagram Followers Video Gone Viral

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..