INDvsSA : धोनीला काय हाकलता, त्यानेच घेतली ट्वेंटी20 मालिकेतून माघार

वृत्तसंस्था
Thursday, 29 August 2019

भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनीने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध होणाऱ्या ट्वेंटी20 मालिकेतून माघार घेतली आहे. भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात होणाऱ्या तीन ट्वेंटी20 सामन्यांसाठी तो उपलब्ध नसल्याचे त्याने स्पष्ट केले आहे.

नवी दिल्ली : भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनीने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध होणाऱ्या ट्वेंटी20 मालिकेतून माघार घेतली आहे. भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात होणाऱ्या तीन ट्वेंटी20 सामन्यांसाठी तो उपलब्ध नसल्याचे त्याने स्पष्ट केले आहे.

विश्वकरंडकानंतर धोनी क्रिकेटमधून निवृत्त होणार अशा चर्चांना उधाण आले होते. मात्र, त्याने क्रिकेटमधून दोन महिन्यांचा ब्रेक घेत लष्करी प्रशिक्षण घेतले. त्याचे हे प्रशिक्षण 15 ऑगस्टला पूर्ण झाले. त्यानंतर आता धोनी पुन्हा मैदानात खेळताना दिसणार असे त्याच्या चाहत्यांना वाटत होते मात्र, धोनीने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध होणाऱ्या मालिकेतून माघार घेतली आहे. 

''दक्षिण आफ्रिकेविरुद्ध होणाऱ्या मालिकेत धोनीने स्वत: निवडीसाठी उपलब्ध केलेले नाही,'' अशी माहिती सूत्रांनी दिली. भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात होणाऱ्या मालिकेसाठी सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात बीसीसीआय संघनिवड करणार आहे.  
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: MS Dhoni Unavailable For South Africa T20Is