जरा थांबा! धोनी काही एवढ्यात निवृत्त होत नाहीये

वृत्तसंस्था
शुक्रवार, 12 जुलै 2019

भारतीय संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनी निवृत्त होण्याच्या चर्चा काही थांबत नाहीत त्यातच तो वेस्ट इंडीजविरुद्ध होणार्या मालिकेसाठी जाणार नाही अशीही शक्यता वर्तविण्यात आली, म्हणजे आता तो खरंच निवृत्त होतोय असे चित्र उभे राहिले. मात्र, असे काही नसून त्याच्या हाताला झालेल्या दुखापतीमुळे तो विश्रांती घेण्याची शक्यता आहे. 

वर्ल्ड कप 2019 : नवी दिल्ली : भारतीय संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनी निवृत्त होण्याच्या चर्चा काही थांबत नाहीत त्यातच तो वेस्ट इंडीजविरुद्ध होणार्या मालिकेसाठी जाणार नाही अशीही शक्यता वर्तविण्यात आली, म्हणजे आता तो खरंच निवृत्त होतोय असे चित्र उभे राहिले. मात्र, असे काही नसून त्याच्या हाताला झालेल्या दुखापतीमुळे तो विश्रांती घेण्याची शक्यता आहे. 

यासंदर्भात अधिक माहिती मिळू शकली नसली, तरीही यंदाच्या विश्‍वकरंडक स्पर्धेच्या संघात समावेश असलेल्या दिनेश कार्तिक आणि रिषभ पंत या दोघांनाही विंडीज दौऱ्यावर जाण्याची संधी मिळू शकते. संघात दोन यष्टिरक्षक असल्याने धोनी विंडीजच्या दौऱ्यामध्ये नसणार अशी शक्यता वर्तविला जात आहे. ही शक्यता खरी जरी असली तरी त्यामागे निवृत्ती नाही तर त्याची दुखापत कारणीभूत आहे. 

न्यूझालंडविरुद्ध झालेल्या सामन्यात एक फटका मारताना धोनीच्या उजव्या हाताच्या बोटाला दुखापत झाली आणि त्याच चेंडूवर तो धावबादही झाला. त्यामुळे तो सामन्यानंतर सर्वांना डाव्या हाताने हस्तांदलोन करताना दिसला होता. त्याच्या याच दुखापतीमुळे त्याला विश्रांती देण्याची शक्यता आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: MS Dhoni will be rested for WI tour as he is injured