लवकरच नवा निवड समिती अध्यक्ष आणणार; गांगुलींनी दिला शब्द

वृत्तसंस्था
शनिवार, 28 डिसेंबर 2019

संपूर्ण निवड समिती बदलणार नसल्याचेही गांगुलींनी स्पष्ट केले. एमएसके प्रसाद आणि गगन खोडा यांचा कालावधी संपुष्टात आला असून आता त्यांच्याऐवजी नवीन लोकांची निवड केली जाणार आहे.

नवी दिल्ली : भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे अध्यक्ष यांनी टीम इंडियाला लवकरच नवे निवड समिती अध्यक्ष मिळतील असा शब्द दिला आहे. एमएसके प्रसाद लवकरच निवड समितीचे अध्यक्षपद सोडतील आणि त्यांच्या जागी नव्या अध्यक्षांची निवड केली जाईल, असे गांगुलींनी स्पष्ट केले आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

संपूर्ण निवड समिती बदलणार नसल्याचेही गांगुलींनी स्पष्ट केले. एमएसके प्रसाद आणि गगन खोडा यांचा कालावधी संपुष्टात आला असून आता त्यांच्याऐवजी नवीन लोकांची निवड केली जाणार आहे. निवड समितीतील जतिन परांजपे, सरनदीपसिंग आणि देवांग गांधी हे समितीतच काम करणार आहेत. त्यांचा कार्यकाळ पुढील वर्षी संपणार आहे. 

''फक्त दोन सदस्यांची नियुक्ती करण्यात येणार आहे,'' असे गांगुलींनी स्पष्ट केले. 

कुलदीप यादवसह 'या' खेळाडूची हकालपट्टी; महिला कर्मचाऱ्याशी गैरवर्तन

सल्लागार समिती निवडणार नवा अध्यक्ष
बीसीसआयची सल्लागार समिती टीम इंडियाच्या निवड समितीच्या नव्या अध्यक्षांची निवड करणार असल्याचे गांगुलींनी स्पष्ट केले आहे. बीसीसीआयच्या नियमांनुसार सल्लागार समितीनेच निवड समितीतील सदस्याची निवड करायची आहे. त्यामुळे ही निवड करण्याआधी बीसीसीआयला एक सल्लागार समितीसुद्धा स्थापन करावी लागणार आहे. 
प्रसाद आणि खोडा यांच्याजागी लवकरच बीसीसीआय नवीन नियुक्ती करेल. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: MSK Prasad To Be Replaced Soon Confirms Sourav Ganguly