ISL 2024: मुंबई सिटी ठरले चॅम्पियन! अंतिम सामन्यात मोहन बगानला चारली पराभवाची धूळ

Mumbai City FC: मुंबई सिटीने दुसऱ्यांदा इंडियन सुपर लीग स्पर्धेचे विजेतेपद पटकावले आहे. शनिवारी झालेल्या अंतिम सामन्याच त्यांनी मोहन बगानला पराभवाचा धक्का दिला.
Mumbai City FC
Mumbai City FCX/IndSuperLeague

Mumbai City FC ISL 2024 Winner: इंडियन सुपर लीग 2023-24 स्पर्धेचे विजेतेपद मुंबई सिटी एफसीने पटकावले आहे. कोलकातामधील सॉल्ट लेक स्टेडियमवर झालेल्या अंतिम सामन्यात मुंबईने मोहन बगान सुपर जायंट्सला 3-1 अशा गोलफरकाने पराभवाचा धक्का दिला.

मुंबई सिटीने इंडियन सुपर लीगचे विजेतेपद मिळवण्याची ही दुसरी वेळ होती. यापूर्वी त्यांनी 2020-21 मध्ये विजेतेपद जिंकले होते.

काही दिवसांपूर्वीच मोहन बगानने मुंबईला मागे टाकत पाँइंट्स-टेबलमध्ये अव्वल क्रमांक मिळवत आयएसएल शिल्ड जिंकली होती. परंतु आता अंतिम सामन्यात त्यांना मुंबईने पराभूत करत विजेतेपदाला गवसणी घातली.

Mumbai City FC
ISL मध्ये घडणार इतिहास! तब्बल १३३ वर्षांची परंपरा असलेला मोहम्मेडन स्पोर्टिंग संघही उतरणार स्पर्धेत

अंतिम सामन्यात सुरुवातीला दोन्ही संघांनी एकमेकांना तगडी लढत दिली होती. पण तरी मोहन बगानने आघाडी घेण्यात यश मिळवले होते. 44 व्या मिनिटाला जेसन कमिंग्सने मोहन बगानसाठी पहिला गोल नोंदवला होता. त्यामुळे पहिला हाफ संपला, तेव्हा मोहन बगान आघाडीवर होते.

मात्र, दुसऱ्या हाफमध्ये मुंबईने दमदार पुनरागमन केले. 53 व्या मिनिटाला जॉर्ज पेरेयरा दियाझने मुंबईला बरोबरी साधून दिली. त्याला हा गोल नोंदवण्यासाठी अल्बर्टो नोग्युएराने असिस्ट केले.

त्यानंतर बिपीन सिंगने सामना संपण्यासाठी 9 मिनिटे राहिले असताना गोल करत मुंबईला आघाडीवर नेले. सामन्यातील निर्धारित 90 मिनिटे झाली, तेव्हा मुंबई 2-1 अशा फरकाने आघाडीवर होते.

Mumbai City FC
Virat Kohli: 'आमचा सामना तर एका बॉलमध्येच संपू शकतो...' विराट असं का म्हणाला? पाहा Video

त्यानंतर रेफ्रीने 9 मिनिटे भरपाई वेळ वाढवला. त्यावेळी 97 व्या मिनिटाला जेकब वोजटसने मुंबईसाठी तिसरा गोल करत विजय निश्चित केला. सामना संपल्यानंतर मुंबई सिटीने जोरदार सेलीब्रेशन केले.

दरम्यान, या संपूर्ण सामन्यात चेंडूवर 58 टक्के ताबा मुंबई सिटी एफसीचा होता, तर 42 टक्के ताबा मोहन बगानवर होता. या सामन्यातील मोहन बगानच्या पराभवामुळे मात्र कोलकातामधील फुटबॉल चाहते चांगलेच नाराज झाले. अनेकांनी सामना संपण्यापूर्वीच स्टेडियममधून बाहेर पडणे पसंत केले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com