
Prithvi Shaw Sapna Gill Controversy : टीम इंडियाचा सर्वात वादग्रस्त पृथ्वी शॉला मुंबई पोलिसांनी अखेर दिलासा दिला आहे. सोशल मीडिया स्टार सपना गिलने पृथ्वी शॉ आणि त्याच्या मित्रांवर विनयभंग आणि मारहाणीचा आरोप करत एफआयआर दाखल केली होती.
या प्रकरणी मुंबई पोलिसांनी आपली चौकशी पूर्ण केली असून त्याचा अहवाल न्यायालयात सादर केला आहे. या अहवालानुसार दिल्ली कॅपिटल्सचा सलामीवीर पृथ्वी शॉवरील आरोप खोटे असल्याचे सांगितले. मुंबई पोलिसांनी पृथ्वी शॉला निर्दोष ठरवले.
सपना गिलने अंधेरी कोर्टात पृथ्वी शॉ आणि त्याचा मित्र आशिष यादव यांच्याविरूद्ध तीन जामीनपात्र गुन्ह्याखाली एफआयआर दाखल करण्याची मागणी केली होती.
IPC Section 354: महिलेच्या विनयभंगाच्या उद्येशाने हल्ला करणे.
IPC Section 509: महिलेचा विनभंग करण्याच्या उद्येशाने हावभाव किंवा शब्दांचा प्रयोग करणे.
IPC 324: सपना गिलवर बॅटने हल्ला करण्याचा प्रयत्न करणे.
सपना गिलने न्यायालयाचा दरवाजा ठोठावण्यापूर्वी अंधेरी येथील एअरपोर्ट पोलीस ठाण्यात पृथ्वी शॉ आणि त्याच्या मित्राविरूद्ध विनयभंगाची तक्रार दाखल केली होती. पोलिसांनी न्यायालयात सांगितले की पबमधील सीसीटीव्हीमध्ये सपना गिल आणि तिचा मित्र शोबित ठाकूर हे मद्यपान करून नाचत होते.
ठाकूरला पृथ्वी शॉचा मोबाईलवर व्हिडिओ काढायचा होता. मात्र क्रिकेटपटू पृथ्वी शॉने त्याला व्हिडिओ काढण्यापासून रोखले. या सीसीटीव्ही फुटेजनुसार शॉ आणि इतरांनी सपना गिलचा विनयभंग केल्याचे आढळून आलेले नाही.
पोलिसांनी सांगितले की त्यांनी पबमध्ये उपस्थित असलेल्या साक्षीदारांचे जबाब देखील नोंदवले आहे. या जबाबात कोणीही गिलला चुकीच्या पद्धतीने स्पर्श केलेला नाही.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.