IPL 2019 : चेन्नईचा विजय रथ मुंबईने रोखला

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 4 एप्रिल 2019

डिकॉकप्रमाणे रोहित शर्माही धडपडत संपल्यानंतर युवराज परतला तेव्हा मुंबईची अवस्था 3 बाद 50 अशी झाली होती. फॉर्मात नसलेल्या पोलार्डऐवजी कृणाल पंड्याला बढती देण्यात आली त्याने अधून मधून प्रयत्न केले तरिही चेन्नईच्या गोलंदाजांची बंधने पूर्णपणे झुगारता येत नव्हती. 

आयपीएल 2019:  मुंबई : अडखळत-लडखत पुढे सरकणाऱ्या डावाला अखेरच्या दोन षटकांत हार्दिंक पंड्या आणि पोलार्डच्या अतिशय स्फोटक फलंदाजीचे (45 धावा)  मिळालेले टॉनिक आणि त्यानंतर गोलंदाजीतील देखणी कमगिरी यामुळे मुंबई इंडियन्सने गतविजेत्या चेन्नईचा तीन लढतींचा विजय रथ रोखला 37 धावांनी विजय साकारत स्वतःच्या आयपीएल आव्हानाला नवे बळ दिले.

वानखेडे स्टेडियमवर झालेला हा सामना कमालीचा उत्कंठावर्धक होता. प्रथम फलंदाजी करणारा मुंबई संघ 18 षटकांत 5 बाद 125 आणि 20 व्या षटकाअखेर 5 बाद 170 अशा सुद्धृड अवस्थेत आला. येथेच खऱ्या अर्थाने त्यांच्यासाठी सामना सुरु झाला होता. त्यानंतर  बेहरँडॉफ, मलिंगा, हार्दिक पंड्या यांच्या गोलंदाजीने चेन्ऩई फलंदाजीच्या मुसक्या आवळल्या. केदार जाधव एकटा लढला पण त्याचा अर्धशतकी प्रतिकार पुरेसा ठरला नाही.  

सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा- 

IPL 2019 : हुश्श! मुंबई एकदाची जिंकली; धोनीची 'डॅडी आर्मी' प्रथमच हारली!

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Mumbai Indians beat Chennai Super Kings at Wankhede in IPL 2019