esakal | IPL पूर्वी MI च्या ओपनरचा धमाका; आफ्रिकेनं उडवला लंकेचा धुव्वा
sakal

बोलून बातमी शोधा

Sri Lanka vs South Africa

IPL पूर्वी MI च्या ओपनरचा धमाका; आफ्रिकेनं उडवला लंकेचा धुव्वा

sakal_logo
By
सुशांत जाधव

Sri Lanka vs South Africa, 3rd T20I : सलामीवीर क्विंटन डि कॉक आणि रिझा हॅड्रिक्सच्या नाबाद अर्धशतकाच्या जोरावर दक्षिण आफ्रिकेनं श्रीलंकेला 10 विकेट्सनी पराभूत केले. या सामन्यातील विजयासह यजमान दक्षिण आफ्रिका संघाने घरच्या मैदानावर खेळणाऱ्या श्रीलंकेला 3-0 असे 'व्हाइट वॉश' केले. पहिल्यांदा बॅटिंग करताना श्रीलंकेनं निर्धारित 20 षटकात 8 बाद 120 धावा केल्या होत्या. या माफक धावांचा पाठलाग करताना दक्षिण आफ्रिकेच्या सलामी जोडीनं 15.4 षटकातच सामना खिशात घातला.

हॅड्रिक्सने 42 चेंडूत 5 चौकार आणि एका षटकाराच्या मदतीने 56 धावांची नाबाद खेळी केली. दुसऱ्या बाजूला क्विंटन डि कॉकनं 46 चेंडूत 7 चौकाराच्या मदतीने 59 धावा कुटल्या. क्विंटन डिकॉक आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्सच्या डावाची सुरुवात करतो. दुसऱ्या टप्प्यातील स्पर्धेसाठी सज्ज असल्याचे संकेतच त्याने आपल्या लंकेविरुद्धच्या धमाकेदार खेळीतून दिले. क्विंटन डिकॉकनं सामनावीरासह मालिकावीराचा पुरस्कारही पटकवला.

हेही वाचा: नवरा-बायकोचं नातं तुटंल; बाप-लेकाचं प्रेम कायम!

तत्पूर्वी पहिल्यांदा फलंदाजी करताना श्रीलंकेची सुरुवात खराब झाली. अविष्का फर्नांडो धावफलकावर 18 धावा असताना तंबूत परतला. त्याने 12 धावांची भर घातली. सलामीवीर कुशल परेराने श्रीलंकेकडून सर्वाधिक 39 धावांची खेळी केली. त्याच्यानंतर कमिंडू मेंडिस 10, कर्णधार शलाका 11, करुणारत्ने 24 वगळता अन्य कोणत्याही फलंदाजाला दुहेरी आकडा पार करता आला नाही. दक्षिण आफ्रिकेकडून फॉर्चुन, रबाडा यांनी प्रत्येकी 2-2 विकेट घेतल्या. मार्करम, केशव महाराज आणि मुल्दर यांना प्रत्येकी 1-1 विकेट मिळाली.

श्रीलंका आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात टी-20 मालिकेपूर्वी तीन सामन्यांची वनडे मालिका खेळवण्यात आली होती. या मालिकेत श्रीलंकेनं दक्षिण आफ्रिकेला 2-1 असे पराभूत केले होते. दक्षिण आफ्रिकेनं टी-20 मालिकेत या पराभवाची परतफेड केली. टी-20 मालिकेतील पहिल्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेनं 28 धावांनी विजय मिळवला होता. या सामन्यात क्विंटन डिकॉकनं 36 धावांची खेळी केली होती. त्यानंतर दुसऱ्या सामन्यात क्विंटन डिकॉक 58 धावांवर नाबाद राहिला तर तिसऱ्या आणि अखेरच्या सामन्यातही त्याने नाबाद अर्धशतकी खेळी साकारली.

loading image
go to top