Chandrayaan 3 Mumbai Indians : चंद्र घेतला कवेत आता... मुंबई इंडियन्सने रोहितचा फोटो शेअर करत दिले मोठे संकेत

Chandrayaan 3 Mumbai Indians
Chandrayaan 3 Mumbai Indiansesakal

Chandrayaan 3 Mumbai Indians : भारतीय अवकाश संस्था इस्त्रोने आज (दि. 23) चांद्रयान 3 मोहीम यशस्वी करून दाखवत आपले विक्रम लँडर हे चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरवण्यात यश मिळवले. यानंतर देशभरातूनच नाही तर जगभरातून इस्त्रोवर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. सोशल मीडियावर तर अभिनंदनाच्या ट्विट्सचा महापूर आला आहे. (Rohit Sharma)

मात्र या सर्व ट्विट्समध्ये मुंबई इंडियन्सने केलेले एक ट्विट चांगलेच व्हायरल होत आहे. 2019 ला भारताची चांद्रयान 2 मोहीम यशस्वी झाली नव्हती. विक्रम लँडरचे क्रॅश लँडिंग झाल्याने संपूर्ण देशाची निराशा झाली होती. त्याचवर्षी झालेल्या वनडे वर्ल्डकपमध्ये देखील भारताला वर्ल्डकप जिंकण्यात अपयश आले होते.

Chandrayaan 3 Mumbai Indians
Chandrayaan 3 : सराव, जेवण सोडून बसले होते डोळे लावून; टीम इंडियाही झाली चांद्रयान 3 मोहीमेची साक्षीदार

मात्र 2023 मध्ये इस्त्रोने चांद्रयान 3 मोहीम यशस्वी करून दाखवली. विक्रम लँडरचे सॉफ्ट लँडिंग झाले असून आता रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ देखील वर्ल्डकप जिंकावा अशी अपेक्षा क्रिकेट चाहते व्यक्त करत आहेत. हाच धागा पकडून मुंबई इंडियन्स एक ट्विट केले.

Chandrayaan 3 Mumbai Indians
Chandrayaan 3 : सराव, जेवण सोडून बसले होते डोळे लावून; टीम इंडियाही झाली चांद्रयान 3 मोहीमेची साक्षीदार

चांद्रयान 3 यशस्वी झाल्यानंतर अनेक क्रिकेटपटूंनी देखील आपली प्रतिक्रिया दिली आहे. टीम इंडियाने देखील आयर्लंडमध्ये तिसऱ्या टी 20 सामन्यापूर्वी चांद्रयान 3 मधील विक्रम लँडरचे सॉफ्ट लँडिगचे थेट प्रक्षेपण पाहण्याचा आनंद लुटला होता.

बीसीसीआयने टीम इंडियाचा हा व्हिडिओ आपल्या ट्विटर अकाऊंटवरून शेअर केला. या व्हिडिओत कर्णधार जसप्रीत बुमराहसह सर्व संघ सराव आणि जेवण बाजूला ठेवून स्कीनसमोर बसली होती. चांद्रयान 3 मोहीम यशस्वी झाल्यानंतर त्यांनी टाळ्या वाजवून इस्त्रोचे कौतुक केले.

Chandrayaan 3 Mumbai Indians
Chess World Cup Final 2023 : दुसरा गेम देखील झाला ड्रॉ, प्रग्नानंदचा 'विश्वविजय' लांबणीवर

याचबरोबर भारताचा माजी सलामीवीर आणि भाजपचा खासदार गौतम गंभीरने देखील चांद्रयान 3 च्या यशानंतर ट्विट केले. त्याने वेल डन इंडिया अशा तीन शब्दातच प्रतिक्रिया दिली. त्यानंतर गौतम गंभीरने पंतप्रधान नरेंद्र मोदींचे ट्विट रिट्विट केले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com