esakal | पोलार्ड तुसी ग्रेट हो! CSK च्या तावडीतून MI ची सुखरुप सुटका

बोलून बातमी शोधा

MIvsCSK
पोलार्ड तुसी ग्रेट हो! CSK च्या तावडीतून MI ची सुखरुप सुटका
sakal_logo
By
सुशांत जाधव

Mumbai vs Chennai, 27th Match : केरॉन पोलार्डने 34 चेंडूतील 87 धावांच्या नाबाद खेळीच्या जोरावर मुंबई इंडियन्सने 200 पारची लढाई पहिल्यांदाच जिंकली. चेन्नई सुपर किंग्जने दिलेल्या 219 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना शेवटच्या षटकात मुंबईला 16 धावांची गरज होती. एनिग्डीच्या गोलंदाजीत 16 धावा करुन पोलार्डने संघाला विजय मिळवून दिला. दिल्लीतील अरुण जेटली मैदानात मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्ज यांच्यात सामना रंगला होता. रोहित शर्मा आणि क्विंटन डिकॉक या जोडीने 71 धावांची खेळी करुन संघाला चांगली सुरुवात करुन दिली. रोहित शर्मा बाद झाल्यानंतर सुर्यकुमार अवघ्या 3 धावांची भर घालून फिरला. त्यानंतर पोलार्डने सामन्याची सर्व सूत्रे आपल्या हाती घेतली. पांड्या बंधू परतल्यानंतर पोलार्डने अखेरच्या षटकात संघाला विजय नोंदवून दिला.

हेही वाचा: IPL 2021:पोलार्डने तुफान फटकेबाजीसह नोंदवली फास्टर फिफ्टी!

मुंबईचा कर्णधार रोहित शर्माने टॉस जिंकून पहिल्यांदा फिल्डिंगचा निर्णय घेतला. पहिल्या ओव्हरमध्ये बोल्टने चेन्नई सुपर किंग्जला पहिला धक्का दिलाय. ऋतूराज गायकवाड अवघ्या 4 धावा करुन माघारी फिरला. त्यानंतर फाफ ड्युप्लेसी आणि मोईन अली या जोडीने चेन्नईचा डाव सावरला. दोघांनी दुसऱ्या विकेटसाठी 108 धावांची भागीदारी केली. बुमराहने मोईन अलीच्या रुपात मुंबई इंडियन्सला दुसरे यश मिळवून दिले. पोलार्डने अर्धशतकी खेळी करणाऱ्या फाफ ड्युप्लेसीसह रैनाची विकेट घेतली. त्यानंतर रायडू आणि रविंद्र जडेजाने मुंबईच्या गोलंदाजांचा खरपूस समाचार घेतला. रायडूने 27 चेंडूत 4 चौकार आणि 7 षटकाराच्या मदतीने 72 धावांची नाबाद खेळी केली. दुसऱ्या बाजूला जडेजाने 22 चेंडूत 22 धावा करत त्याला उत्तम साथ दिली. या दोघांनी 5 व्या विकेटसाठी केलेल्या 102 धावांच्या भागीदारीच्या जोरावर चेन्नई सुपर किंग्डजने 4 गड्यांच्या मोबदल्यात 218 धावा केल्या आहेत.

  • 116-4 : 200 वा सामना खेळणारा रैना 2 धावा करुन माघारी पोलार्डला दुसरे यश

  • 116-3 : फाफ ड्युप्लेसीसही 28 चेंडूत 50 धावा करुन माघारी, पोलार्डला मिळाली विकेट

  • 112-2 : बुमराहने लावला मोईन अलीच्या खेळीला ब्रेक, त्याने 36 चेंडूत 58 धावांची खेळी केली.

  • 4-1 : चेन्नई सुपर किंग्जचा सलामीवीर स्वस्तात माघारी, बोल्टने घेतली ऋतूराजची विकेट