esakal | IPL 2021:पोलार्डने तुफान फटकेबाजीसह नोंदवली फास्टर फिफ्टी!

बोलून बातमी शोधा

 Kieron Pollard
IPL 2021:पोलार्डने तुफान फटकेबाजीसह नोंदवली फास्टर फिफ्टी!
sakal_logo
By
सुशांत जाधव

चेन्नई सुपर किंग्जने दिलेल्या 219 धावांचे टार्गेट चेस करताना मुंबई इंडियन्सच्या सलामीवीरांनी चांगली सुरुवात करुन दिली. क्विंटन डिकॉक आणि रोहित शर्मा यांनी पहिल्या विकेटसाठी 71 धावांची भागीदारी केली. रोहित शर्मा 24 चेंडूत 35 धावा करुन बाद झाल्यानंतर मैदानात उतरलेला सुर्यकुमार यादव अवघ्या 3 धावांची भर घालून चालता झाला. मोईन अलीने क्विंटन डिकॉकला बाद करत मुंबईला बॅकफूटवर ढकलले. पण त्यानंतर मैदानात उतरलेल्या पोलार्डने आपल्या भात्यातून अक्षरश: आग ओतली.

हेही वाचा: VIDEO : 3D मॅनचा धमाका; बोल्ट, बुमराहलाही सोडलं नाही

दिल्लीच्या मैदानात षटकारांची बरसात करत पोलार्डने यंदांच्या हंगामातील सर्वात जलद अर्धशतक पूर्ण केले. 17 चेंडूत त्याने अर्धशतकाला गवसणी घातली. 15 व्या षटकातील शार्दुल ठाकूरच्या चौथ्या चेंडूवर खणखणीत चौकार मारुन त्याने अर्धशतक पूर्ण केले. यापूर्वी पृथ्वी शॉने कोलकाता नाईट रायडर्स विरुद्धच्या सामन्यात 18 चेंडूत फिफ्टी केली होती.

हेही वाचा: 'मुंबई इंडियन्स'च्या जर्सीमधली नवी 'मिस्ट्री गर्ल' कोण?

आयपीएलच्या आतापर्यंतच्या इतिहासात सर्वात जलद अर्धशतक झळकवण्याचा विक्रम हा पंजाब किंग्जचा कॅप्टन लोकेश राहुलच्या नावे आहे. 2018 च्या हंगामात लोकेश राहुलने 14 चेंडूत 6 चौकार आणि 4 षटकाराच्या मदतीने अर्धशतक झळकावले होते. अरुण जेटली स्टेडियमवर चेन्नई सुपर किंग्जने दिलेल्या धावांचा पाठलाग करताना पोलार्डचा धमाका पाहायला मिळाला. कॅरेबियन गड्याने 17 चेंडूत 3 चौकार आणि 6 षटकाराच्या मदतीने अर्धशतक पूर्ण केले.