IPL 2020 MIvsDC Final : आडनाड जेतपदाची परंपरा मोडीत काढत मुंबई पलटन पाचव्यांदा चॅम्पियन

सकाळ स्पोर्टस् ऑनलाईन
Tuesday, 10 November 2020

मुंबई इंडियन्सने दिल्ली कॅपिटल्सला नमवत पाचव्यांदा उंचावली ट्रॉफी

 IPL 2020  Mumbai Indians vs Delhi Capitals Final : रोहित शर्माची अर्धशतकी खेळी आणि इशान किशनने त्याला दिलेली सुरेख साथ याच्या जोरावर मुंबई इंडियन्सने दिल्ली कॅपिटल्सने दिलेले 157 धावांचे लक्ष्य सहज पार करत पाचव्यांदा चॅम्पियनचा बहुमान मिळवला. प्रथम फलंदाजी करताना दिल्ली कॅपिटल्सने निर्धारित 20 षटकात 7 बाद 156 धावा केल्या होत्या. हे आव्हान मुंबईने सहज परतावून लावले. कर्णधार रोहित शर्माने 68 धावांची खेळी केली. इशान किशनने 19 चेंडूत नाबाद 32 धावांची खेळी करत संघाच्या विजयावर शिक्कामोर्तब केले.  

 युएईच्या मैदानात पहिल्यांदा फायनल गाठलेल्या दिल्ली कॅपिटल्ससमोर विक्रमी चारवेळ चॅम्पियन ठरलेल्या मुंबई इंडियन्सचे आव्हान आहे. दिल्ली कॅपिटल्सचा कर्णधार श्रेयस अय्यरने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. 

कर्णधार श्रेयस अय्यर आणि ऋषभ पंत यांच्या अर्धशतकाच्या जोरावर  ट्रेंट बोल्टने सुरुवातीला दिलेल्या धक्क्यातून सावरत दिल्ली कॅपिटल्सने दिडशेचा टप्पा पार केला. कर्णधार श्रेयस अय्यरने शेवटपर्यंत मैदानात थांबत संघाला निर्धारित 20 षटकांत 7 बाद 155 धावांपर्यंत पोहचवले.

त्याने कर्णधाराला साजेसा खेळ करत 49 चेंडूत नाबाद 64 धावांची खेळी केली. त्याच्या शिवाय पंतने केलेल्या 38 चेंडूतील 56 धावांचे योगदान महत्त्वपूर्ण ठरले. ही जोडी वगळता अन्य कोणत्याही फलंदाजाला मैदानात तग धरता आला नाही. मुंबई इंडियन्सकडून ट्रेंट बोल्टने सर्वाधिक 3 तर नॅथन कुल्टर नीलने 2 आणि जयंत यादवने एक विकेट घेतली. 

सामन्याचे अपडेट्स

118-4 : संघाचा डाव सावरणारा पंत अर्धशतकी करुन परतला, कुल्टर नीलला मिळाले यश, पंतने 38 चेंडूत 56 धावा केल्या
 

22-3 : शिखर धवन 15 धावांवर बाद, जयंत यादवने घेतली विकेट 

 

 

 

16-2 : अजिंक्य रहाणेचा पुन्हा फ्लॉप शो; अवघ्या 2 धावा करुन फिरला माघारी बोल्टनं घेतली विकेट

 

 

0-1 : अष्टपैलू आणि सलामीवीर स्टॉयनिसला बोल्टनं पहिल्या चेंडूवर धाडले तंबूत

 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Mumbai Indians vs Delhi Capitals Final Live Cricket Score Record Result