IPL2019 : अखेरच्या चेंडूवर मुंबईच्या विजेतेपदाचा चौकार

सकाळ वृत्तसेवा
Monday, 13 May 2019

हैदराबाद, ता. 12 ः  ज्या लसिथ मलिंगाने महत्वाच्या क्षणी तब्बल 20 धावा देऊन मुंबईच्या हातात आलेला सामना चेन्नईच्या जणूकाही हातात नेऊन दिला होता त्याच मलिंगाने अखेरच्या चेंडूवर दोन धावांची गरज असताना विकेट मिळवली आणि यंदाच्या आयपीएलचा थरार मुंबईने एका धावेने जिंकला. 

हैदराबाद, ता. 12 ः  ज्या लसिथ मलिंगाने महत्वाच्या क्षणी तब्बल 20 धावा देऊन मुंबईच्या हातात आलेला सामना चेन्नईच्या जणूकाही हातात नेऊन दिला होता त्याच मलिंगाने अखेरच्या चेंडूवर दोन धावांची गरज असताना विकेट मिळवली आणि यंदाच्या आयपीएलचा थरार मुंबईने एका धावेने जिंकला. 

अनेक नाट्यमय घडामोडी घडलेल्या त्यामुळे पारडे सातत्याने बदलणाऱ्या... कमालीच्या चुरशीच्या सामन्यात मोक्याची वेळी वॉटसनने केलेली टोलेबाजी आणि त्याला मिळालेले जीवदान सामन्यात रंग भरणारी ठरली होती, परंतु 2013, 2015, 2017 आणि आता 2019 असे विषम अंकाचे वर्ष मुंबई इंडियन्ससाठी मात्र सुदैवी ठरले.
सामन्यात कमालीचे रंग भरलेले असताना बुमारा एका बाजूने भेदक मारा करून धावा रोखत होता आणि विकेटही मिळवत होता, पण दुसऱ्या बाजूने प्रामुख्याने मलिंगा आणि कृणाल पंड्याने मुकबल धावा दिल्या त्यामुळे पिछाडीवर पडलेल्या चेन्नईला सामन्यात परतला आले त्यातच राहुल चहरने झेल सोडल्यावर वॉटसनने 59 चेंडूत 80 धावा करून सामना चेन्नईसाठी जिंकून दिल्यातच जमा होता. वॉटसन महत्वाच्या क्षणी धावचीत झाला त्यावेळी चेन्नईला विजयासाठी चेंडूत चार धावांची गरज होती. शार्दुल ठाकूरने दोन धावा केल्या पण अखेरच्या चेंडूवर मलिंगाने त्याला पायचीत केले आणि अगोदरचे सर्व अपयश एका चेंडूने धुवून काढले. 

150 धावांचे आव्हान तसे फसवे असते, पुढे जाऊन धोका होऊ शकतो यासाठी सुरुवातीलाच जास्तीत जास्त धावा करण्यावर सलामीवीरांचा भर असतो. डुप्लेसी आणि वॉटसन या चेन्नईच्या सलामीवीरांनी हेच केले. डुप्लेसीने कृणाल पंड्यावर हल्ला केला पण त्यानेच त्याला बाद केले आणि मुंबईला पहिले यश मिळाले. 
त्यानंतर सुरेश रैना एका रिव्ह्यूवर बाद देऊनही वाचला पण दुसऱ्यांदा त्याला दैवाने साथ दिली नाही. रिव्ह्यू घेऊनही तो बाद झाला राहुल चहरने त्याला पायचीत केले त्यानंतर बुमराने रायडूला आल्यापायी माघारी धाडले. 

धोनीच्या धावचीतचे नाट्य
धोनी मैदानात आला मैदानात प्रंचड उत्साह आणि थरार रंगू लागला होता. परिस्थिती ओळखून धोनीचा पवित्रा सावध होता, परंतु एका ओव्हर थ्रोवर दुसरी धाव घेण्याच्या प्रयत्नाने त्याचा घात केला. तिसऱ्या पंचांनी बराच वेळ घेतल्यानंतर त्याला धावचीत ठरवले, परंतु एका रिव्ह्यूमध्ये तो बाद असल्याचे तर दुसऱ्या रिव्ह्यूमध्ये नाबाद असल्याचे दिसून येत होते.

30 चेंडूत 62 धावांच गरज असताना सामना मुंबईच्या हातात होता, परंतु 16 व्या षटकांत वॉटनस आणि ब्रावो यांनी 20 धावा वसूल करून 24 चेंडूत 42  असे समिकरणे केले

डिकॉकचा हल्ला पण...
पहिल्या दोन षटकांत दहा धावाच झाल्यानंतर डिकॉकने दीपक चहरला टार्गेट केले त्याच्या एका षटकांत दोन षटकार आणि एका चौकारासह 20 धावांची वसूली केली त्यामुळे मुंबईच्या 3 षटकांत 30 धावा झाल्या होता. कोणत्याही सामन्यासाठी ही आश्वासक सुरुवात होती, पण पुढच्या षटकापासून चित्रच बदलत गेले.

शार्दुल ठाकूरने उसळत्या चेंडूवर डिकॉकला बाद केले पण त्याला बोटाने पॅव्हेलियनमध्ये जाण्याची खुन्नस दाखवली. याची रोहितनेही पंचांकडे नाराजी व्यक्त केली, पण येथेच रोहितचा संयमही सुटला आण धोनीचेही नेतृत्व कौशल्य निर्णायक ठरले. चहर महागडा ठरलेला असला तरी त्याला गोलंदाजी दिली आणि चहरने रोहीतची विकेट मिळवली. मुंबईच्या  डावाला येथेच कलाटणी मिळाली.

दोन्ही सलामीवीर पाठोपाठ बाद झालेले असल्यामुळे इशान किशन आणि सूर्यकुमार यादव यांना बचावात्मक पवित्र्या शिवाय पर्याय नव्हता ही संधी साधून धोनीने दडपण वाढवत नेले.  10 व्या षटकांत कृणाल पंड्याने दोन चौकार मारले तरीही मुंबईच्या खात्यात 70 धावाच जमा झाल्या. 
ताहीर पुन्हा हुकमी

12 व्या षटकांत धोनीने इम्रान ताहीर हे आपले आपले महत्वाचे अस्त्र बाहेर काढले आणि त्याच्या पहिल्याच षटकांत सूर्यकुमार यादव बाद झाला. त्यानंतर मुंबईची मधली फळी कोलमडतच गेली.

पोलार्डने दिला हात
सर्व आशा होत्या त्या पोलार्ड आणि हार्दिक पंड्या यांच्यावर बर्थ डे बॉय पोलार्डने संधी मिळताच काही चेंडू प्रेक्षकांमध्ये भिरकावले. त्यातच हार्दिकचा झेल रैनाने सोडला तेव्हा मंबईच्या पाठीराख्यांनी निश्वास सोडला पण हार्दिक त्याचा फार फायदा घेऊ शकला नाही. अखेरच्या षटकांतील वाईड नाट्यानंतर पोलार्डने दोन चौकार मारले तेव्हा कोठे मुंबईला 149 धावा करता आल्या.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Mumbai Indians wins IPL 2019 Final