Video : विजयची हाणामारी! डीकेचं भूत काही मानगुटीवरून उतरत नाही | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Murali Vijay AND DK

Video : विजयची हाणामारी! डीकेचं भूत काही मानगुटीवरून उतरत नाही

Murali Vijay : भारत आणि वेस्ट इंडीज यांच्यातील टी 20 मालिका 29 जुलैपासून सुरू होत आहे. यासाठी दिनेश कार्तिक वेस्ट इंडीजमध्ये दाखल झाला आहे. दरम्यान, भारतात देखील तामिळनाडू प्रीमियर लीग स्पर्धा सुरू आहे. या स्पर्धेत भारतीय संघाकाडून खेळलेला मुरली विजय देखील खेळत आहे. तेव्हा त्याने असे काही केल ज्यामुळे तो आता वादात सापडला आहे.

हेही वाचा: IPL फ्रँचायजींची जगभरात 'दादागिरी', गिलख्रिस्टने केली टिका

काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत होता. ज्यामध्ये एका सामन्यावेळी मुरली विजय फिल्डिंग करताना प्रेक्षकांनी दिनेश कार्तिकच्या जयघोष सुरू केला. त्यानंतर मुरली विजयही चाहत्यांसमोर हात जोडताना दिसला. आता पुन्हा एकदा चाहते त्याला दिनेश कार्तिकचे नाव घेऊन चिडवत होते, मात्र यावेळी मुरली विजयने स्टँडमध्ये घुसून त्याला मारहाण करण्यास सुरुवात केली. हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

मुरली विजय सध्या सोशल मीडियावर त्याच्या या कृतीमुळे ट्रेंड करत आहे. त्याने चाहत्याला मारहाण करतानाचा व्हिडिओ चांगलाच व्हायरल होत आहे. या सामन्यात मुरली विजय प्लेइंग इलेव्हनचा भाग नसून पर्यायी खेळाडू म्हणून तो सीमारेषेवर क्षेत्ररक्षण करत होता. यादरम्यान स्टँडवर बसलेल्या एका चाहत्याने दिनेश कार्तिकचे नाव घेऊन त्याची छेड काढण्यास सुरुवात केली. कार्तिकचे नाव ऐकताच मुरली विजयला राग आला आणि स्टँडमध्ये बसलेल्या प्रेक्षकांकडे जाऊन त्याला मारहाण करू लागला.

दिनेश कार्तिकची पहिली पत्नी निकिता वंजाराचे मुरली विजय सोबत अफेअर सुरू होत. त्यानंतर निकिताने कार्तिकला घटस्फोट देत मुरली विजयसोबत लग्न केले. कार्तिकनेही आपल्या पत्नीला आनंदाने घटस्फोट दिला आणि दोघेही आपापल्या आयुष्यात आनंदी दिसत असताना चाहत्यांनी दोघांच्याही आयुष्यातील कटू क्षण अनेकवेळा लक्षात ठेवण्यास भाग पाडले आहे.

दिनेश कार्तिकने त्यानंतर 2015 मध्ये स्क्वॉश खेळाडू दीपिका पल्लीकल सोबत लग्न केले. सध्या दिनेश कार्तिक भारतीय संघासोबत वेस्ट इंडीज दौऱ्यावर आहे. दिनेश कार्तिकने 2022 च्या आयपीएलमध्ये दमदार कामगिरी करत भारतीय संघात पुनरागमन केले. दिनेश कार्तिकची फॅन फॉलोईंग मोठ्या प्रमाणात वाढली आहे. भारत वेस्ट इंडीजमध्ये 5 टी 20 सामन्यांची मालिका खेळणार आहे.

Web Title: Murali Vijay And Fan Fight Because Of Dinesh Karthik In Tamil Nadu Premier League Cricket

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top