छोट्या मुशफिकूरचे मोठे रेकॉर्ड; असं करणारा ठरला पहिला बांगलादेशी

Mushfiqur Rahim Test Cricket Record
Mushfiqur Rahim Test Cricket Recordesakal

Bangladesh vs Sri Lanka, 1st Test: श्रीलंकेविरूद्धच्या पहिल्या कसोटीसामन्यात बांगलादेशचा छोट्या शरीरयष्टीच्या मुशफिकूर रहीमने (Mushfiqur Rahim) एक मोठा विक्रम आपल्या नावावर केला. पहिल्या कसोटी सामन्यात (Test Cricket) बांगलादेशच्या पहिल्या डावात रहीमने आपले आठवे कसोटी शतक ठोकले. मुशफिकूर रहीमने 105 धावांची शतकी खेळी केली. या शतकी खेळीच्या जोरावर त्याने कसोटी क्रिकेटमधील आपल्या 5000 धावा (5000 Test Runs) पूर्ण केल्या. याचबरोबर त्याने बांगलादेशच्या क्रिकेट इतिहासात आपले नाव सुवर्णाक्षरांनी कोरले. (Test Record)

Mushfiqur Rahim Test Cricket Record
IPL 2022 : हे आठ संघ गाठू शकतात प्ले ऑफ, पण कसे?

मुस्तफिकूर रहीम हा बांगलादेशच्या क्रिकेट इतिहासातील 5000 धावा पूर्ण करणारा पहिला फलंदाज ठरला आहे. रहीम बरोबरच तमीम इकबाल देखील कसोटीमध्ये 5000 धावा पूर्ण करण्याच्या उंबरठ्यावर आहे. इकबालच्या 4981 कसोटी धावा झाल्या आहेत. या धावा त्याने 66 कसोटी सामन्यात केल्या आहेत. तर रहीमने आपल्या 5000 कसोटी धावा 81 कसोटीत पूर्ण केल्या आहेत.

कसोटी क्रिकेटमध्ये सर्वात वेगवान 5000 धावांचा टप्पा पार करण्याच्या विक्रम सर डॉन ब्रॅडमन यांच्या नावावर आहे. त्यांनी फक्त 56 डावात 5000 धावा पूर्ण केल्या होत्या. यानंतर इंग्लंडच्या जॅक हॉब्स यांनी 91 डावात 5000 धावा पूर्ण केल्या. याचबरोबर वेस्ट इंडीजच्या गॅरी सोबर्स यांनी 95 डावात 5000 धावा पूर्ण केल्या. ते या यादीत तिसऱ्या स्थानावर आहेत. त्यांच्याबरोबर भारताचे सुनिल गावसकर यांनी देखील 95 डावात 5000 कसोटी धावा पूर्ण केल्या होत्या.

Mushfiqur Rahim Test Cricket Record
मुंबई इंडियन्समध्ये अर्जुन तेंडुलकर विरुद्ध राजकारण सुरू?

बांगलादेश आणि श्रीलंका यांच्यातील पहिल्या कसोटीबाबत बोलायचे झाले तर बांगलादेशने पहिल्या डावात 465 धावा केल्या आहेत. यात मुशफिकूर रहीम बरोबरच तमीम इकबालने 133 धावा केल्या. तर लिटन दासने 88 धावा करून बांगलादेशला मोठी धावसंख्या उभरारण्यात मोलाचे योगदान दिले. श्रीलंकेने पहिल्यांदा फलंदाजी करत पहिल्या डावात 397 धावा केल्या होत्या. यात अँजेलो मॅथ्यूजच्या 199 धावांचे मोठे योगदान आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com