IPL 2022 : हे आठ संघ गाठू शकतात प्ले ऑफ, पण कसे?

IPL 2022 8 Teams Have A Chance To Qualify For Play Off According 32 Win Combination
IPL 2022 8 Teams Have A Chance To Qualify For Play Off According 32 Win Combination esakal

IPL 2022 : यंदाच्या 15 व्या हंगामातील लीग स्टेजचे फक्त 5 सामने शिल्लक राहिले आहेत. सध्या गुणतालिकेत गुजरात टायटन्स 20 गुण घेऊन अव्वल स्थानी विराजमान आहे. गुजरात एकमेव संघ आहे जो प्ले ऑफसाठी क्वालिफाय झाला आहे. इतर तीन संघांसाठी तब्बल आठ संघ झुंजणार आहेत. गणितीपद्धतीने विचार केला तर सध्या जवळपास 32 संभाव्य निकालाचे कॉम्बिनेश (32 Win Combination) असू शकतात. (IPL 2022 8 Teams Have A Chance To Qualify For Play Off According 32 Win Combination)

IPL 2022 8 Teams Have A Chance To Qualify For Play Off According 32 Win Combination
मुंबई इंडियन्समध्ये अर्जुन तेंडुलकर विरुद्ध राजकारण सुरू?

1 - मुंबई इंडियन्स (MI) आणि चेन्नई सुपर किंग्ज (CSK) प्ले ऑफच्या शर्यतीतून बाहेर गेले आहेत. तर गुजरात 20 गुण मिळवून प्ले ऑफमध्ये दाखल झाले आहे.

2 - सनराईजर्स हैदराबादला (SRH) पहिल्या चार संघात स्थान मिळवता येऊ शकते. कालच्या विजयानंतर त्यांची ही संघी 12.5 टक्क्यांनी वाढली आहे. यासाठी त्यांना शेवटचा सामना जिंकावा लागले. तसेच आरसीबी गुजरातबरोबरचा शेवटचा सामन्यात पराभूत होणे गरजेचे आहे. जर असे झाले तर सनराईजर्स हैदराबाद 14 गुण मिळवेल आणि दिल्ली कॅपिटल्स, आरसीबी तसेच केकेआर बरोबर संयुक्तरित्या चौथ्या स्थानावर राहू शकते. केकेआरने जर लखनौ सुपर जायंट विरूद्धचा सामना जिंकला तर हे सर्व संघ संयुक्तरित्या चौथ्या स्थानावर येऊ शकतात.

3 - केकेआरला (KKR) देखील प्ले ऑफमध्ये दाखल होण्याची शक्यता 12.5 टक्के इतरी आहे. यासाठी त्यांना लखनौबरोबरचा सामना जिंकवाच लागेल. तसेच गुजरात टायटन्सने आरसीबीला आणि मुंबईने दिल्लीला पराभूत करावे यासाठी देव पाण्यात ठेवावे लागतील. असे झाले तरच केकेआर 14 गुण मिळवून दिल्ली, आरसीबी आणि हैदराबाद किंवा पंजाब यांच्याबरोबर ते संयुक्तरित्या चौथ्या स्थानावर राहू शकतो.

4 - पंजाब किंग्जला (PBKS) देखील प्ले ऑफ गाठण्यासाठी 12.5 टक्के चान्सेस आहेत. यासाठी त्यांना हैदराबादला पराभूत करावे लागेल. तसेच मुंबई इंडियन्सने दिल्लीला आणि गुजरातने आरसीबीला पराभूत करावे लागेल. या परिस्थितीत पंजाबला 14 गुण मिळतील आणि ते दिल्ली, आरसीबी आणि केकेआर यांच्यासोबत संयुक्तरित्या 14 गुणांवर राहतील.

IPL 2022 8 Teams Have A Chance To Qualify For Play Off According 32 Win Combination
गजब! दिनेश कार्तिककडे 90 कोटींची मालमत्ता, कोटींच्या गाड्या - पाहा फोटो

5 - दिल्ली कॅपिटल्सला (DC) प्ले ऑफमध्ये दाखल होण्याचे 75 टक्के चान्सेस आहेत. त्यांनी जर शेवटच्या सामन्यात मुंबईचा पराभव केला आणि लखनौ सुपर जायंट्सने केकेआर विरूद्ध आणि राजस्थान रॉयल्सने सीएसकेविरूद्ध सामने हरले तर दिल्ली प्ले ऑफमध्ये दाखल होऊ शकतो. अशा परिस्थितीत दिल्ली तिसऱ्या स्थानावर लखनौ आणि राजस्थान रॉयल्स यांच्याबरोबर संयुक्तरित्या राहून आपले प्ले ऑफचे तिकीट बूक करू शकते. जर दिल्ली मुंबई विरूद्धचा सामना हरली तरी ती दोन किंवा तीन संघांबरोबर संयुक्तरित्या चौथ्या स्थानावर राहू शकते.

6 - आरसीबीला (RCB) देखील दिल्ली प्रमाणे पहिल्या चार संघात स्थान मिळवण्याची संधी 75 टक्के आहे. यासाठी त्यांना गुजरात टायटन्स विरूद्धचा अखेरचा सामना जिंकावा लागले. याचबरोबर लखनौ केकेआरकडून आणि राजस्थान सीएसकेकडून पराभूत होणे गरजेचे आहे. अशा परिस्थिती आरसीबीला 16 गुण मिळतील. ते लखनौ, राजस्थान किंवा लखनौ, राजस्थान आणि दिल्ली अशा दोन किंवा तीन संघांबरोबर संयुक्त स्थान मिळवेल. जरी ते शेवटचा सामना हरले तरी ते दोन किंवा तीन संघांसोबत चौथ्या स्थानावर संयुक्तरित्या असतील.

7 - राजस्थान रॉयल्स (RR) गुणतालिकेत दुसऱ्या किंवा तिसऱ्या स्थानावर राहू शकतो. जर त्यांनी चेन्नई विरूद्धचा सामना जिंकला आणि केकेआरने लखनौला पराभूत केले तर 18 गुणांसह ते एकटे दुसऱ्या स्थानावर राहू शकतात. मात्र त्यांनी जर सीएसके विरूद्धचा सामना गमावला तरी देखील ते एकटे तिसऱ्या स्थानावर विराजमान होऊ शकतात. यासाठी केकेआरने लखनौला, मुंबईने दिल्लीला आणि गुजरातने आरसीबीला हरवणे गरजेचे आहे. किंवा ते तिसऱ्या स्थानावर आरसीबी किंवा दिल्ली किंवा दोन्हींबरोबर संयुक्तरित्या राहू शकता. जर तीन संघांचे सामना गूण झाले तर रनरेटवर कोण तिसऱ्या स्थानावर राहणार हे स्पष्ट होईल.

8 - लखनौची (LSG) स्थिती देखील राजस्थान रॉयल्स सारखीच आहे. ते संयुक्तरित्या दुसऱ्या किंवा तिसऱ्या स्थानावर राहतील हे नक्की आहे. जर लखनौने केकेआविरूद्धचा शेवटचा सामना जिंकला आणि चेन्नईने राजस्थानचा पराभव केला तर ते एकटे दुसऱ्या स्थानावर असतील. जर त्यांनी शेवटचा सामना गमावला तरी ते राजस्थान प्रमाणे तिसऱ्या स्थानावर संयुक्तरित्या राहून रनरेटच्या आधारे क्वालिफाय करू शकतात.

IPL 2022 8 Teams Have A Chance To Qualify For Play Off According 32 Win Combination
लक्ष्मण होणार इंडियाचा हेड कोच? द्रविडच्या जागी मिळणार मोठी जबाबदारी

टाईम्स ऑफ इंडियाने या निकालांचे 32 कॉम्बिनेशन तयार केले आहेत. हे कॉम्बिनेशन लीग स्टेजचे सहा सामने राहिले असताना केले आहे. आयपीएल 2022 च्या या 32 कॉम्बिनेशनमधील 24 कॉम्बिनेशनमध्ये आरसीबी पहिल्या चार संघात स्थान मिळवण्याची शक्यता आहे. यामुळे त्यांचे प्ले ऑफ खेळण्याचे चान्सेस 75 टक्के आहेत. त्यांनी रनरेट आणि अनिर्णित निकाल याची शक्यता गृहीत धरलेली नाही. कारण आधीच याची अंदाज वर्तवणे अशक्य आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com