Mary Kom: 'माझे मणिपूर जळत आहे, मदत करा...', बॉक्सर मेरी कोमने रात्री उशिरा PM मोदींकडे मागितली मदत

Manipur Violence Mary Kom
Manipur Violence Mary Kom

Manipur Violence Mary Kom : मणिपूरमध्ये मेईतेई समुदायाचा अनुसूचित जमाती प्रवर्गात समावेश करण्याच्या मागणीविरोधात 3 मे रोजी विद्यार्थी संघटनेने आंदोलन केले. आंदोलनादरम्यान मणिपूरमध्ये झालेल्या हिंसाचारानंतर बुधवारी आठ जिल्ह्यांमध्ये कर्फ्यू लागू करण्यात आला आणि संपूर्ण ईशान्येकडील राज्यात मोबाइल इंटरनेट सेवा बंद करण्यात आली. भारतीय महिला बॉक्सर मेरी कोमने ट्विट करून पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे मदत मागितली आहे.

Manipur Violence Mary Kom
IPL 2023 Points Table: मुंबई इंडियन्सच्या विजयानंतर प्लेऑफची शर्यत झाली रंजक! 'या' संघाचे वाढले टेन्शन

मेरी कोमने ट्विट करत लिहिले की, "माझे राज्य मणिपूर जळत आहे. कृपया मदत करा." या ट्विटमध्ये त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, पंतप्रधान कार्यालय, गृहमंत्री अमित शाह आणि संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांना टॅग करत मणिपूर मधील फोटो शेअर केले आहेत.

Manipur Violence Mary Kom
IPL 2023: एका पराभव अन् दोन्ही संघांच्या प्ले-ऑफमध्ये पोहोचण्याच्या आशा संपुष्टात! हैदराबाद-कोलकता आज लढत

मणिपूरमध्ये लष्कर आणि सशस्त्र दलांच्या मदतीने हिंसाचार आटोक्यात आणण्यात आला आहे. ३ मेच्या रात्री राज्य सरकारकडून लष्कर आणि सशस्त्र दलाची मदत मागवण्यात आली होती, त्यानंतर राज्य पोलिसांसह लष्कराने रात्री उशिरा हस्तक्षेप करून परिस्थिती नियंत्रणात आणली आणि सकाळपर्यंत हिंसाचार आटोक्यात आला.

मेईती समाजाचा एसटी प्रवर्गात समावेश करण्याच्या मागणीला विरोध करण्यासाठी बुधवारी ऑल ट्रायबल स्टुडंट्स युनियनने मोर्चा काढला होता. या मोर्चादरम्यान चुरचंदपूरमध्ये हिंसाचार झाला.

Manipur Violence Mary Kom
IPL 2023 Points Table: मुंबई इंडियन्सच्या विजयानंतर प्लेऑफची शर्यत झाली रंजक! 'या' संघाचे वाढले टेन्शन

या रॅलीत हजारो आंदोलक सहभागी झाल्याचे पोलीस अधिकाऱ्याने सांगितले. यादरम्यान तोरबांग भागात आदिवासी आणि बिगर आदिवासींमध्ये हिंसाचार झाल्याच्या बातम्या आल्या होत्या. अधिकार्‍याने दिलेल्या माहितीनुसार, इम्फाळ पश्चिम, कक्चिंग, थौबल, जिरीबाम आणि बिष्णुपूर व्यतिरिक्त आदिवासीबहुल चुराचंदपूर, कांगपोकपी आणि टेंगनौपाल जिल्ह्यात कर्फ्यू लागू करण्यात आला आहे. यासोबतच पाच दिवस संपूर्ण राज्यात इंटरनेट सेवा तात्काळ प्रभावाने बंद करण्यात आली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com