
नागपूर : अवघ्या १९व्या वर्षी नागपूरच्या दिव्या देशमुखने बुद्धिबळातील ‘वर्ल्डकप’ जिंकून केवळ देशाचाच नव्हे तर नागपूर व महाराष्ट्राचीही मान व प्रतिष्ठा उंचावली आहे. तिच्या या ऐतिहासिक व विक्रमी कामगिरीचा आम्हा सर्वांना आनंद व अभिमान असल्याची भावना, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी येथे आयोजित नागरी सत्कार समारंभात व्यक्त केली.