World Cup 2019 : सामन्यादरम्यान नग्न अवस्थेत मैदानात आला अन्... (व्हिडिओ)

वृत्तसंस्था
शुक्रवार, 5 जुलै 2019

एक व्यक्ती नग्नावस्थेत मैदानावर आली अन् नृत्य केले. सुरक्षा रक्षकांनी त्याला अडवण्याचा प्रयत्न करत असताना तो त्यांना चकवा देत होता. संबंधित व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

लंडनः इंग्लंड आणि न्यूझीलंड यांच्यादरम्यान बुधवारी (ता. 3) सुरू असलेल्या सामन्यादरम्यान एक व्यक्ती नग्नावस्थेत मैदानावर आली अन् नृत्य केले. सुरक्षा रक्षकांनी त्याला अडवण्याचा प्रयत्न करत असताना तो त्यांना चकवा देत होता. संबंधित व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

न्‍यूझीलंडची फलंदाजी सुरू होती. 34व्या षटकामध्ये एक व्यक्ती अचानक नग्न अवस्थेत मैदानात आली. मैदानात त्याने नृत्याचे वेगवेगळे प्रकारही केली. सुरक्षा रक्षकांनी त्याला अडवण्याचा प्रयत्न करत होते. परंतु, तो त्यांना सापडत नव्हता. यावेळी प्रेक्षक आनंद लुटताना हासत असल्याचे दिसत आहे. न्‍यूझीलंडचे टॉम लाथम आणि मिचेल सेंटनर आणि इंग्‍लंडचे खेळाडू मैदानावर हे पाहत होते. अखेर सुरक्षा रक्षकांनी पाच मिनिटानंतर त्याला ताब्यात घेतले कपड्यांनी झाकले आणि बाहेर घेऊन गेले. पण, या व्यक्तीने सुरक्षा रक्षकांना मैदानावर पळवले. यावेळी खेळापेक्षा चर्चा झाली ती नग्न व्यक्तीची.

दरम्यान, इंग्लंडने न्यूझीलंडचा 119 धावांनी पराभव केला. इंग्लंडने 1992 नंतर 27 वर्षांनी वर्ल्डकपच्या सेमीफायनलमध्ये धडक दिली आहे. या वर्ल्डकपमध्ये सेमीफायनलमध्ये पोहचणारी इंग्लंड तिसरी टीम ठरली आहे. शिवाय, ऑस्ट्रेलिया आणि भारतही याआधी सेमीफायनलमध्ये पोहोचली आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: naked man enter in ground during eng vs nz match video viral