esakal | नारायण, रसेल, लीन कोलकाताची हुकमी त्रयी 
sakal

बोलून बातमी शोधा

kolkata night riders

आयपीएलच्या अंतिम टप्प्यात आपण आलो आहोत आणि यासारखी रंगत दुसरी कोणतीही असू शकत नाही. चेन्नई संघाने सातव्यांदा अंतिम फेरी गाठली याचे आश्‍चर्य वाटायला नको; पण हैदराबाद आणि कोलकाता यांच्यातील सामना शिल्लक असल्यामुळे अजूनही थरार कायम आहे.

नारायण, रसेल, लीन कोलकाताची हुकमी त्रयी 

sakal_logo
By
वृत्तसंस्था

कोलकाता - आयपीएलच्या अंतिम टप्प्यात आपण आलो आहोत आणि यासारखी रंगत दुसरी कोणतीही असू शकत नाही. चेन्नई संघाने सातव्यांदा अंतिम फेरी गाठली याचे आश्‍चर्य वाटायला नको; पण हैदराबाद आणि कोलकाता यांच्यातील सामना शिल्लक असल्यामुळे अजूनही थरार कायम आहे. हैदराबादसाठी गोलंदाजी ही त्यांची जमेची बाजू आहे. त्याच्या जोरावर त्यांची कमी धावसंख्या निर्णायक ठरवली आहे. ज्या खेळाडूंनी त्यांना अगोदरच्या आयपीएलमध्ये विजय मिळवून दिले आहेत, ते सध्या बाहेर आहेत. त्याचा परिणाम कदाचित त्यांच्या कामगिरीवर सध्या होताना दिसत आहे. भुवनेश्‍वरकडून सूत्रे घेत सिद्धार्थ कौल आता स्वतः जबाबदारी घेण्यास सज्ज आहे. अखेरच्या टप्प्यात त्याने नकल बॉलवर चांगले नियंत्रण मिळवलेले दिसत आहे. शिखर धवन सातत्यपूर्ण योगदान देत आहे; परंतु कर्णधार केन विलिम्सनने आपली फलंदाजी आणखी एका उंचीवर नेली आहे. धोकादायक फटकेबाजी करण्यापेक्षा त्याचा भर क्रिकेटचे पारंपरिक फटके मारण्यावर आहे. गोलंदाजांवर वर्चस्व मिळवण्यासाठी तो आपल्या अनुभवाचा कौशल्याने वापर करत आहे. या दोघांच्या साथीला पांडे, पठाण, शकिब आणि ब्राथवेट यांनी योगदान दिले तर त्यांच्या फलंदाजीची ताकद वाढवू शकतो; पण रशीद खान, सिद्धार्थ आणि भुवनेश्‍वर हे त्यांचे हुकमी एक्के असतील. 

आंद्रे रसेल, सुनील नारायण आणि ख्रिस लीन या त्रयीच्या जोरावर कोलकाता जोमात आहे. या तिघांकडे सामन्याला कलाटणी देण्याची क्षमता आहे. सलामीला येऊन बेधडक फलंदाजी करण्याची नारायणची क्षमता संघाला मोठी पायाभरणी करणारी ठरते. गोलंदाजीतही तो फारच प्रभावी ठरतो, त्यामुळे त्याचे अष्टपैलुत्व अफलातून आहे. या तिघा खेळाडूंसह दिनेश कार्तिक, रॉबीन उथप्पा, कुलदीप आणि पीयूष चावला हे खेळाडू संघाची ताकद वाढवत आहेत. 

अंतिम फेरीत प्रवेश करण्यासाठी होत असलेल्या या सामन्याचे दडपण वाढत आहे. सामन्याचा निकाल काहीही लागला तरी हा सामना रोमहर्षक होईल हे निश्‍चित. 

loading image