Asian Games 2026 : नाशिकच्या सर्वेश कुशारेनं जिंकलं ऐतिहासिक पदक! भारताच्या खात्यात १५ मिनिटांच्या अंतरानं ४ मेडल्स

Sarvesh Kushare silver medal Asian Games 2026: आशियाई क्रीडा स्पर्धेतील रविवारचा दिवस भारतासाठी पदकांच्या दृष्टीने महत्त्वाचा ठरला. पावसाचा व्यत्यय आणि स्पर्धांचे वेळापत्रक बदलत असतानाही भारतीय खेळाडूंनी दमदार कामगिरी करत अवघ्या १५ मिनिटांच्या अंतरात चार पदकांची कमाई केली.
Sarvesh Kushare silver medal Asian Games 2026

Sarvesh Kushare silver medal Asian Games 2026

Updated on: 

Nashik’s Sarvesh Kushare Asian Games 2026: हरिता भद्राच्या ( Harita Bhadra) २०० मीटर शर्यतीतील कांस्यपदकानंतर मैदानी स्पर्धेत भारतीय खेळाडूंनी आणखी पदकं जिंकली. आशियाई क्रीडा स्पर्धा २०२६ मध्ये रविवारचा दिवस भारतासाठी काही खास राहिला नाही. स्क्वॉशमध्ये दोन सुवर्णपदक जिंकण्याची संधी अभय सिंग ( पुरुष एकेरी) व अनाहत सिंग ( महिला एकेरी) यांनी गमावली. त्यांना रौप्यपदकावर समाधान मानावे लागले. त्याचवेळी महिलांच्या लांब उडीत एन्सी सोजन एडाप्पिल्लीलाही रौप्यपदक मिळाले, तर शैली सिंग चौथ्या स्थानावर राहिली. तेजस्वीन शंकरने डेकॅथलॉन स्पर्धेत ७९३४ गुणांसह कांस्यपदक निश्चित केले. नाशिकच्या सर्वेश कुशारे ( Sarvesh Kushare) उंच उडीत रौप्यपदक जिंकले.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com