National Cricket Club Honors Mumbai Groundsmen
esakal
मुंबई क्रिकेट असोसिएशनशी संलग्न असलेल्या नॅशनल क्रिकेट क्लबने मुंबईतील क्रिकेटच्या मैदानांना आकार देणाऱ्या ५५ ग्राऊंड्समनचा गौरव केला आहे. मुंबईत आयोजित विशेष सोहळ्यात हा सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाला आमदार मिलिंद नार्वेकर, एमसीएचे ऍपेक्स सदस्य व भारताचे माजी क्रिकेटपटू जतीन परांजपे आणि अनुभवी पिच क्यूरेटर नदीम मेमन उपस्थित होते.