NATIONAL SPORTS AWARDS 2025: यंदा 'खेलरत्न' कुणालाच नाही, १७ अर्जुन पुरस्कार विजेत्या खेळाडूंमध्ये एकही क्रिकेटपटू नाही

Vidith Gujarathi and Divya Deshmukh Arjuna Awards : राष्ट्रीय क्रीडा पुरस्करांची घोषणा करण्यात आली असून यंदाच्या पुरस्कारांमध्ये एक मोठा धक्का पाहायला मिळाला आहे. यावर्षी कोणत्याही खेळाडूला मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार देण्यात आलेला नाही.
Vidith Gujarathi and Divya Deshmukh  Arjuna Awards

Vidith Gujarathi and Divya Deshmukh Arjuna Awards

Updated on: 

National Sports Awards 2025 no Khel Ratna award announced: क्रीडा मंत्रालयाने मंगळवारी २०२५ च्या राष्ट्रीय क्रीडा पुरस्कारांची घोषणा केली. २०२५ मधील उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या १७ खेळाडूंना अर्जुन पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे आणि यंदा कोणत्याही खेळाडूला मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार देण्यात आलेला नाही. तसेच जाहीर करण्यात आलेल्या १७ अर्जुन पुरस्कार विजेत्यांच्या यादीत एकाही क्रिकेटपटूचा समावेश करण्यात आलेला नाही. नाशिकचा विदीत गुजराथी आणि नागपूरची दिव्या देशमुख, या बुद्धिबळपटूंना अर्जुन पुरस्कार जाहीर झाला आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com