India 2036 Olympics: भारतीय क्रीडा क्षेत्र कायद्याच्या कक्षेत; लोकसभेत विधेयकाला मंजुरी,ऑलिंपिक आयोजनासाठी महत्त्वपूर्ण पाऊल
Lok Sabha approval of sports bill: राष्ट्रीय क्रीडा विधेयकाला अखेर लोकसभेत मंजुरी मिळाली असून हे पाऊल २०३६ मधील ऑलिंपिक आयोजनाच्या दृष्टीने महत्त्वाचे ठरणार आहे.
नवी दिल्ली: अखेर राष्ट्रीय क्रीडा विधेयकाला लोकसभेत सोमवारी मंजुरी मिळाली. २०३६ मधील ऑलिंपिक आयोजनाच्या दृष्टीने हे महत्त्वपूर्ण पाऊल असणार आहे. क्रीडा विधेयकासोबतच उत्तेजक द्रव्य प्रतिबंधक सुधारणा विधेयकालाही याप्रसंगी मंजुरी देण्यात आली आहे.