National Sports Competition : महिलांना रौप्य, तर पुरुषांना ब्राँझ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

bronze medal

National Sports Competition : महिलांना रौप्य, तर पुरुषांना ब्राँझ

सुरत : महाराष्ट्राच्या टेबल टेनिसपटूंनी राष्ट्रीय क्रीडा स्पर्धांमध्ये ठसा उमटवला. पुरुष व महिला अशा दोन्ही गटांमध्ये पदक जिंकण्यात महाराष्ट्राला यश लाभले. महाराष्ट्राच्या महिलांनी रौप्यपदक, तर पुरुषांनी ब्राँझपदक पटकावले. महाराष्ट्राच्या महिलांचा अंतिम फेरीत पश्चिम बंगालविरुद्ध १-३ असा पराभव झाला आणि उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. पुरुषांच्या गटात महाराष्ट्राला उपांत्य फेरीतच हार सहन करावी लागल्यामुळे त्यांना ब्रॉंझपदक मिळाले.

महिलांच्या अंतिम लढतीत पश्चिम बंगालच्या ऐहिका मुखर्जी हिने महाराष्ट्राच्या स्वस्तिका घोष हिचा ११-३,११-५,११-३ असा पराभव केला. मात्र दुसऱ्या सामन्यात महाराष्ट्राच्या रीथ रिशा हिने सुतीर्था मुखर्जी हिला ११-९,१३-११,११-९ असे पराभूत करीत लढतीत १-१ अशी बरोबरी केली. दिया चितळे या महाराष्ट्राच्या खेळाडूला बंगालची ज्येष्ठ आंतरराष्ट्रीय खेळाडू मौमा दास हिने ६-११,१६-१४,१०-१२,१४-१२,११-६ अशा चिवट झुंजीनंतर पराभूत केले आणि बंगाल संघास २-१ अशी आघाडी मिळवून दिली. परतीच्या एकेरीत घोष हिला सुतीर्था हिच्याविरुद्ध ४-११, १३-११, ८-११, १२-१०, ६-११ असा पराभव स्वीकारावा लागला. अखेर बंगालने ३-१ अशा फरकाने लढत जिंकून सुवर्णपदकावर नाव कोरले.

कडवी झुंज अपयशी

पुरुषांच्या उपांत्य फेरीत दिल्लीने महाराष्ट्राला ३-२ असे हरवले. महाराष्ट्राच्या दीपित पाटील याला सुधांशू ग्रोवर याने ११-८, ९-११, ११-७, ११-७ असे नमविले. सनील शेट्टी याला पायस जैन याच्याविरुद्धचा सामना ११-६, ८-११, १२-१०, ५-११, ७-११ असा गमवावा लागला. महाराष्ट्राच्या सिद्धेश पांडे याने यशांश मलिक याचा ४-११, ११-९, ११-९, ११-९ असा पराभव केला.

Web Title: National Sports Competition महिलांना रौप्य तर पुरुषांना

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..