esakal | जन्मदात्यांना विमानात बसविण्याचे स्वप्न नीरज चोप्राकडून पूर्ण
sakal

बोलून बातमी शोधा

neeraj chopra

जन्मदात्यांना विमानात बसविण्याचे स्वप्न नीरज चोप्राकडून पूर्ण

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

नवी दिल्ली : टोकियो ऑलिंपिक स्पर्धेत ऐतिहासिक सुवर्णपदक जिंकणाऱ्या भालाफेकपटू नीरज चोप्राने त्याचे अजून एक स्वप्न पूर्णत्वास नेले आहे. शनिवारी सकाळी नीरज चोप्राने आपल्या जन्मदात्या माता-पित्यांचा पहिल्यांदाच विमानप्रवास घडवून आणला. ट्विटरवर आपल्या माता-पित्यांसोबतचे छायाचित्र टाकत त्याने लिहिले की, ‘‘आज आयुष्यातील एक स्वप्न पूर्ण झाले जेव्हा मला पहिल्यांदा माझे आई -वडील विमानामध्ये बसलेले दिसले.

सर्वांच्या प्रार्थना आणि आशीर्वादांसाठी नेहमीच कृतज्ञ राहीन.’’ नीरजने पुरुषांच्या भालाफेकीच्या अंतिम फेरीत ८७.५८ मीटर भाला फेकत ऑलिंपिक सुवर्णपदकाला गवसणी घातली होती. ऑलिंपिकमध्ये सुवर्णपदक जिंकणारा नीरज हा भारताचा दुसरा खेळाडू आहे.

loading image
go to top