Neeraj Chopra: डायमंड लीग अंतिम फेरीमध्ये टायमिंग अन् रनअप सर्वच चुकले; दुसऱ्या स्थानावर घसरण झाल्यानंतर नीरज चोप्राची कबुली
Tokyo World Championship: ज्युलियन वेबरकडून पराभव झाल्यानंतर नीरज चोप्रा झुरिच डायमंड लीगमध्ये दुसऱ्या स्थानावर. टोकियो विश्वचषकात लय मिळवण्याची तयारी सुरू आहे.
झुरिच : रनअप आणि टायमिंग सर्वच चुकले, अशी कबुली नीरज चोप्राने दिली. डायमंड लीग अंतिम फेरीत दुसऱ्या स्थानावर समाधान मानावे लागलेल्या नीरजने आता पुढील महिन्यात टोकियोत होणाऱ्या जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत लय मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली आहे.