Neeraj Chopra : इतिहास रचण्यापासून 0.44 सेंटीमीटरने चुकला नीरज चोप्रा! डायमंड लीग जिंकण्याचं स्वप्न भंगलं

Neeraj Chopra : इतिहास रचण्यापासून 0.44 सेंटीमीटरने चुकला नीरज चोप्रा! डायमंड लीग जिंकण्याचं स्वप्न भंगलं

Neeraj Chopra Diamond League Javelin Throw : भारताचा 'गोल्डन बॉय' भालाफेकपटू नीरज चोप्राने प्रतिष्ठेच्या डायमंड लीगच्या अंतिम फेरीत दुसरे स्थान पटकावले. शनिवारी रात्री उशिरा अमेरिकेतील ओरेगॉन येथे झालेल्या स्पर्धेत त्याने दुसऱ्या प्रयत्नात 83.80 मीटर भाला फेकला. ही त्याची सर्वोत्तम कामगिरी ठरली.

या स्पर्धेत झेक प्रजासत्ताकचा जेकब वडलेच 84.24 मीटरचा सर्वोत्तम थ्रो करून चॅम्पियन बनला. तर, फिनलंडचा ऑलिव्हर हेलँडर 83.74 मीटरसह तिसरा क्रमांक पटकावला.

Neeraj Chopra : इतिहास रचण्यापासून 0.44 सेंटीमीटरने चुकला नीरज चोप्रा! डायमंड लीग जिंकण्याचं स्वप्न भंगलं
ICC ODI World Cup : गांगुलीने द्रविडसोबत जे केलं तेच द्रविड केएलसोबत करतोय; काय घडलं होतं 2003 च्या वर्ल्डकपमध्ये?

डायमंड लीगच्या अंतिम फेरीत नीरज चोप्रा पूर्णपणे त्याच्या लयीत दिसला नाही. फक्त दुसऱ्यांदा 83.80 ची दुसरी सर्वोत्तम कामगिरी करू शकला. तर जाकुब वडलेचने पहिल्याच प्रयत्नात 84.1 मीटर अंतर गाठून आघाडी घेतली. यानंतर त्याने सहाव्या प्रयत्नात 84.27 मीटर अंतर पार करून प्रथम क्रमांक पटकावला.

  • पहिला थ्रो : नीरजचा पहिलाच थ्रो फाऊल गेला.

  • दुसरा थ्रो : नीरजने 83.80 मीटर अंतरावर भाला फेकला. या थ्रोसह तो दुसऱ्या क्रमांकावर आला.

  • तिसरा थ्रो : नीरजने 81.37 मीटर अंतरावर फेकला.

  • चौथा थ्रो : चौथा थ्रो फाऊल.

  • पाचवा थ्रो : नीरजने 80.74 मीटर फेकला.

  • सहावा थ्रो : नीरज चोप्राने सहाव्या आणि शेवटच्या थ्रोमध्ये 80.90 मीटर भाला फेकला.

जर नीरजने हे विजेतेपद पटकावले असते, तर डायमंड लीग जिंकणारा तो तिसरा खेळाडू ठरला असता पण तसे होऊ शकले नाही. फक्त चेक प्रजासत्ताकचे विटेझस्लाव्ह वेसेली (2012,2013) आणि जेकब वडलेच (2016, 2017) हे करू शकले आहेत. नीरजला गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये झुरिच येथे डायमंड लीगची अंतिम फेरी जिंकण्यात यश आले होते.

नीरज चोप्राने डायमंड लीग 2023 मध्ये दमदार कामगिरी केली होती. दोहा डायमंड लीगमध्ये नीरजने 88.67 मीटर अंतर पूर्ण केले होते. याशिवाय त्याने लॉसने डायमंड लीगमध्ये 87.66 मीटर फेक फेकला होता. तो झुरिचमधील डायमंड लीगमध्ये 85.71 मीटर फेकून दुसऱ्या क्रमांकावर राहिला, तर यूजीन डायमंड लीगच्या अंतिम फेरीत त्याचा स्कोअर 83.80 मीटर होता.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com