
भारताचा दोन वेळचा ऑलिम्पिक पदक विजेता नीरज चोप्रा लग्नबंधनात अडकला असून त्याने स्वत: सोशल मीडियावर पोस्ट करत माहिती दिली आहे. त्याने अचानक लग्नाची घोषणा करत सर्वांना चकीत केले आहे.
भारताचा स्टार भालाफेकपटू असलेल्या नीरजने सोशल मीडियावर फोटोही पोस्ट केले आहेत. त्यात त्याने त्याच्या पत्नीचे नाव हिमानी असल्याचेही त्याने सांगितलं. त्यांच्या लग्नसोहळ्यासाठी कुटुंबिय आणि मित्रपरिवार उपस्थित होता.