Neeraj Chopra : अवघे 2 सेंटीमीटर... नीरज टॉप स्पॉटपासून थोडक्यात हुकला

Neeraj Chopra Javelin Thrower
Neeraj Chopra Javelin Thrower esakal

Neeraj Chopra Doha Diamond League 2024 : नीरज चोप्राने दोहा डायमंड लीग स्पर्धेत 88.36 मीटर भालाफेक करत चांगली सुरूवात केली. मात्र टोकियो ऑलिम्पिकमध्ये सिल्वर मेडल जिंकणाऱ्या जेकब वडेलिच 88.38 मीटर भालाफेक करत अव्वल स्थान पटकावले. नीरजचे अव्वल स्थान अवघ्या 2 सेंटीमीटरने हुकले. टोकियो ऑलिम्पिकमध्ये नीरजने गोल्ड मेडल मिळवलं होतं. मात्र दोहा डायमंड लीगमध्ये जेकब वडेलिचने नीरजला मागे टाकलं.

Neeraj Chopra Javelin Thrower
Rahul Dravid India coach : राहुल द्रविडनंतर कोण होणार टीम इंडियाचा कोच...? बीसीसीआयसमोर आहेत 'ही' तगडी नावं

नीरज जरी दोहा डायमंड लीगमध्ये दुसऱ्या स्थानावर असला तरी नीरजनं आपला बेस्ट थ्रो दिला. त्यानं 88.36 मीटर भालाफेक करत आपले सर्वोत्तम प्रदर्शन केलं. नीरजसोबत सहभागी झालेला भारताचा किशोर जेना हा दुसरा भालाफेकपटू 10 पैकी नवव्या स्थानावर राहिला. त्याने 76.31 मीटर लांब भाला फेकला. तो पहिल्या तीन थ्रोनंतर इलिमिनेट झाला.

नीरज चोप्रा गेल्या काही हंगामापासून 90 मीटरचा मार्क पार करण्यासाठी जोर लावत आहे. मात्र दोहा डायमंड लीगमध्ये तो अवघ्या काही मीटरच्या अंतराने 90 मीटर मार्क पार करण्यापासून हुकला.

Neeraj Chopra Javelin Thrower
GT vs CSK IPL 2024 : गुजरातने सीएसकेचे वाढवले टेन्शन; जाता जाता दिला पराभवाचा धक्का

यानंतर नीरज म्हणाला की, 'लोकं माझ्या 90 मीटरची चर्चा 2018 पासून करत आहेत. त्यावेळी मी एशियन गेम्समध्ये 88.06 मीटर लांब भाला फेकला होता. त्यानंतर अनेक गोष्टी झाल्या आहेत. मला कोपराची दुखापत झाली होती. शस्त्रक्रिया झाली आहे. आता मी 88 ते 90 मीटर दरम्यान अडकलो आहे. मात्र मला 90 मीटर मार्क पार करायचा आहे.'

'दोहा हे 90 मीटर भालाफेकीसाठी प्रसिद्ख आहे. मात्र आज वाऱ्याचा वेग जास्त असल्यानं मी फार नशीबवान ठरलो नाही. मात्र उद्याचा दिवस चांगला असू शकतो. नक्कीच हे ऑलिम्पिक वर्ष आहे. भारत हा मोठा देश आहे. सर्वजण सुवर्णाची अपेक्षा करत आहेत. माझे टार्गेट सध्या फिट राहणं आणि तंत्रावर लक्ष केंद्रीत करण्याचे आहे.'

(Neeraj Chopra Marathi News)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com