GT vs CSK IPL 2024 : गुजरातने सीएसकेचे वाढवले टेन्शन; जाता जाता दिला पराभवाचा धक्का

GT vs CSK Live IPL 2024
GT vs CSK Live IPL 2024esakal

चेन्नईची अवस्था बिकट 

गुजरातचे 232 धावांचे आव्हान पार करताना सीएसकेने 12 षटकात 4 बाद 119 धावा केल्या आहेत. 3 बाद 10 धावा अशी अवस्था झाली असताना डॅरेल मिचेल आणि मोईन अलीने डाव सावरत 99 धावांची भागीदारी रचली.

GT vs CSK Live IPL 2024 : गुजरात टायटन्सने सीएसकेला दिले 232 धावांचे आव्हान

तुषार देशपांडेने साई पाठोपाठ 104 धावा करणाऱ्या शुभमन गिलला देखील बाद केलंं. त्यानंतर डेव्हिड मिलरने 11 चेंडूत 16 धावा करत गुजरातला 231 धावांपर्यंत मजल मारून दिली.

GT vs CSK Live IPL 2024 : शुभमन पाठोपाठ साईचं शतक; अखेर सीएसकेच्या तुषार देशपांडेने जोडी फोडली

शुभमन गिल पाठोपाठ साई सुदर्शनने देखील शतक ठोकलं. मात्र सीएसकेच्या तुषार देशपांडेने ही द्विशतकी सलामी देणारी जोडी फोडली. त्यानं साईला 103 धावांवर बाद केलं. साई बाद झाला त्यावेळी गुजरात 210 झाल्या होत्या.

GT vs CSK Live IPL 2024 : साईच्या आधी शुभमननं मारला नंबर; 200 च्या स्ट्राईक रेटने ठोकलं शतक

शुभमन गिलने 50 चेंडूत 100 धावा ठोकत गुजरातला मजबूत स्थितीत पोहचवलं. साई सुदर्शन देखील 96 धावांवर खेळत आहे. तो आधी शतक पूर्ण करेल असं वाटत होतं. माभ गिलने नंबर मारला. गुजरातने 16.2 षटकात बिनबाद 201 धावा केल्या आहेत.

GT vs CSK Live IPL 2024 : साई सुदर्शनने बदलला गिअर; गिलचेही अर्धशतक

गुजरात टायटन्सचा सलामीवीर साई सुदर्शनने दमदार फलंदाजी करत गुजरात टायटन्सला 13.2 षटकात 166 धावांपर्यंत मजल मारून दिली. साई सुदर्शन 92 धावांवर तर गिल 72 धावांवर खेळत आहे.

GT vs CSK Live IPL 2024 : गिलचा पॉवर प्लेमध्ये तडाखे; गुजरात टायटन्सची आक्रमक सुरूवात

गुजरात टायटन्सचा कर्णधार शुभमन गिलने पॉवर प्लेमध्ये आक्रमक फलंदाजी करत गुजरातला 5 षटकात बिनबाद 42 धावांपर्यंत पोहचवलं.

GT vs CSK Live IPL 2024 : अखेर ऋतुराजने नाणेफेक जिंकली; रविंद्रची संघात पुन्हा एन्ट्री

चेन्नई सुपर किंग्जचा कर्णधार ऋतुराज गायकवाडने अखेर नाणेफेक जिंकली असून गुजरात टायटन्सविरूद्धच्या सामन्यात त्यानं गोलंदाजीचा निर्णय घेतला. सीएसकेने संघात एक बदल केला असून रचिन रविंद्र संघात परत आला आहे.

GT vs CSK : हेड टू हेड 

गुजरात आणि चेन्नई यांच्यात हेड टू हेडमध्ये काटे की टक्कर आहे. आतापर्यंत या दोन संघांनी एकमेकांविरूद्ध 6 सामने खेळले आहेत. त्यातील तीन गुजरातने तर तीन चेन्नईने जिंकले आहे.

Gujarat Titans Vs Chennai Super Kings IPL 2024 : गुजरात टायटन्सने चेन्नईचा 35 धावांनी केला पराभव 

गुजरात टायटन्सने चेन्नई सुपर किंग्जचा 35 धावांनी पराभव केला. गुजरातचे 232 धावा करण्याचे आव्हान चेन्नईला पेलवलं नाही त्यांना 20 षटकात 8 बाद 196 धावांपर्यंतच मजल मारता आली. चेन्नईकडून डॅरेल मिचेलने सर्वाधिक 63 धावा केल्या. तर मोईन अलीने 56 धावांची खेळी केली.

आयपीएलच्या 59 व्या सामन्यात गुजरात टायटन्सने सीएसकेविरूद्ध 231 धावा उभारल्या. नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेणाऱ्या ऋतुराजच्या सीएसकेला फक्त दोन विकेट्स घेण्यात यश आलं. सलामीवीर साई सुदर्शन आणि शुभमन गिलने 210 धावांची सलामी दिली. गिलने 104 धावांची तर साईने 103 धावांची शतकी खेळी केली. या दोघांनाही तुषार देशपांडेने 18 व्या षटकात बाद केलं.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com