
नवी दिल्ली : सलग दोन ऑलिंपिकमध्ये पदक पटकावत भारतासाठी ऐतिहासिक कामगिरी करणारा भालाफेकपटू नीरज चोप्रा शुक्रवारी (ता. २२) बेल्जियम येथील ब्रुसेल्स येथे होत असलेल्या डायमंड लीगमधील एका लेगमध्ये (सत्र स्पर्धा) सहभागी होणार नाही; मात्र तरीही भारताच्या या पठ्ठ्याने डायमंड लीगच्या अंतिम फेरीचा पात्रता मिळवली आहे. डायमंड लीगची अंतिम फेरीत स्वित्झर्लंडमधील झुरिच येथे बुधवारी (ता. २७) व गुरुवारी (ता. २८) होणार आहे.