Neeraj Chopra: ऑलिंपिकमध्ये दोन पदके मिळवणारा नीरज चोप्रा पात्र; झुरिचमध्ये २७-२८ ऑगस्ट रोजी डायमंड लीगची फायनल
Diamond League 2025: भारताचा भालाफेकपटू नीरज चोप्रा स्वित्झर्लंडमधील झुरिच येथे होणाऱ्या डायमंड लीग अंतिम फेरीसाठी पात्र ठरला आहे. यंदाच्या मोसमात त्याने दोन स्पर्धांमध्ये सहभाग घेत १५ गुण मिळवून तिसऱ्या स्थानावर राहिला आहे.
नवी दिल्ली : टोकियो व पॅरिस या दोन ऑलिंपिकमध्ये पदक पटकावलेला भारताचा स्टार भालाफेकपटू नीरज चोप्रा स्वित्झर्लंडमधील झुरिच येथे २७ व २८ ऑगस्ट रोजी होत असलेल्या डायमंड लीग अंतिम फेरीसाठी पात्र ठरला आहे.