Neeraj Chopra : नीरज चोप्रानं सांगितलं पॅरिस डायमंड लीगमधून माघारीचं कारण

Neeraj Chopra Paris Dimond League : नीरज चोप्रानं पॅरिस डायमंड लीगमधून दुखापतीमुळं माघार घेतली की कारण दुसरंच आहे?
Neeraj Chopra
Neeraj Chopraesakal

Neeraj Chopra : ऑलिम्पिक सुवर्ण पदक विजेता अन् वर्ल्ड चॅम्पियन भालाफेकपटू नीरज चोप्राने पॅरिस डायमंड लीगमधून माघार घेतली. या माघारीनंतर नीरजने ही माघार दुखापतीमुळे घेतल्याची चर्चा सुरू झाली होती. मात्र आता खुद्द नीरज चोप्रानेच याबाबत खुलासा केला आहे. त्याने सांगितले की पॅरिस डायमंड लीग ही माझ्या कॅलेंडर इयरचा भाग कधीच नव्हती. नीरज चोप्राने एक्सवरून पोस्ट करत ही माहिती दिली.

नीरजचे पोस्ट केली की, 'सर्वांना एक गोष्ट स्पष्ट करतोय की पॅरिस डायमंड लीग ही माझ्या स्पर्धांच्या कॅलेंडर इयरमध्ये कधीच नव्हती. त्यामुळे या स्पर्धेतून मी माघार घेतलेली नाही. मी सध्या ऑलिम्पिक गेम्सची तयारी करत आहे. मला पाठिंबा दिल्याबद्दल आणि समजून घेतल्याबद्दल आभारी आहे. ऑलिम्पिकमध्ये भाग घेणाऱ्या सर्व खेळाडूंना शुभेच्छा!'

Neeraj Chopra
ICC T20I Ranking: हार्दिक पांड्याने रचला इतिहास! रँकिंगमध्ये नंबर वनचा ताज पटकावणारा ठरला पहिलाच भारतीय

नीरज चोप्राला गेल्या आठवड्यात झालेल्या आंतरराज्यीय चॅम्पियनशिपमधूनही वगळण्यात आलं होते. अॅथलिट फेडरेशन ऑफ इंडियाने या स्पर्धेत भारताच्या सर्व अॅथलिट्सना सहभागी होणे बंधनकारक केलं होतं.

अॅथलिट फेडरेशन ऑफ इंडियाने हा निर्णय डायमंड लीग आणि आंतरराज्यीय चॅम्पियनशिपमध्ये फार कमी वेळ असल्याने घेतला होता.

एएफआय अध्यक्ष अदिल सुमरीवाला यांनी सांगितले की, 'आम्ही स्पष्टपणे सांगितले होते की सर्व खेळाडूंना आंतरराज्यीय चॅम्पियनशिपमध्ये खेळावे लागणार आहे. मात्र डायमंड लीग आणि चॅम्पियनशिप क्लॅश होत असल्याने तसेच नीरजसाठी पॅरिस डायमंड लीग महत्वाचं असल्याने फक्त त्यालाच विशेष सवलत दिली होती.'

Neeraj Chopra
T20 World Cup: फायनलपूर्वी कॅप्टन रोहितने भारतीय संघाला काय सांगितलं होतं? सूर्याने केला खुलासा

चोप्रा म्हणाला होता की, 'मी आंतरराज्यीय चॅम्पियनशिप खेळावी याबाबत चर्चा केली होती. ही पंचकुलामध्ये होणार होती. मात्र ही स्पर्धा पॅरिस ऑलिम्पिक जवळ आली असताना होणार आहे. त्यामुळं आम्ही फेडरेशन कपमध्ये खेळण्याचा निर्णय घेतला होता.'

माझ्या शारीरिक स्थितीवर पुढचं शेड्युल कसं असेल याचा निर्णय घेण्यात आला. नाहीतर मी पॅरिसला डायमंड लीग खेळण्यासाठी गेलो असते.'

नीरज चोप्राने टोकियो ऑलिम्पिकमध्ये ट्रॅक अँड फिल्ड प्रकारात भारताला पहिलं सुवर्ण पदक जिंकून दिलं होतं. त्याने गेल्या महिन्यात झालेल्या पाव्हो नुरमी गेम्समध्ये देखील सुवर्ण पदक पटकावलं. मात्र यावेळी त्याने त्याच्या दुखापतीबाबत माहिती दिली होती. तो वेगवेगळ्या डॉक्टरांचा सल्ला घेत असल्याचेही सांगितले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com