Neeraj Chopra : भले शाब्बास... नीरज चोप्राने भालाफेकीत ९० मीटरचे अंतर अखेर गाठले, असा पराक्रम करणारा तिसरा आशियाई खेळाडू

Neeraj Chopra conquers the 90m mark : नीरज चोप्रानं अखेर भालाफेकीत ९० मीटरचं अंतर पार करत इतिहास रचला आहे. दोहा डायमंड लीगमध्ये आपल्या तिसऱ्या प्रयत्नात त्याने ९०.२३ मीटर लांब भाला फेकला आणि देशासाठी नवा विक्रम प्रस्थापित केला.
Neeraj Chopra
Neeraj Chopraesakal
Updated on

Neeraj Chopra 90.23m javelin throw at Doha Diamond League

भारताचा गोल्डन बॉय नीरज चोप्रा याने दोहा डायमंड लीगमध्ये अभिमानास्पद कामगिरी केली. पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेत नीरजला ९० मीटर लांबचं अंतर गाठता आले नव्हते आणि त्यामुळे त्याला रौप्यपदकावर समाधान मानावे लागले होते. त्यानंतर नीरज खचला नाही आणि जोमाने पुन्हा तयारीला लागला. त्याचे फळ मिळताना दिसले. आज डायमंड लीगमधील तिसऱ्या प्रयत्नात त्याने ९०.२३ मीटर लांब भाला फेकला.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com