Diamond League : भारताचा ऑलिंपिक पदकविजेता नीरज चोप्रा यंदा झ्युरिचमध्ये होणाऱ्या डायमंड लीग अंतिम फेरीत करंडक आणि ९० मीटर लक्ष्य गाठण्यासाठी सज्ज झाला आहे. जगातील अव्वल भालाफेकपटूंच्या उपस्थितीत स्पर्धा रंगणार आहे.
झ्युरीच : यंदाच्या मोसमातील डायमंड लीगची दोन दिवसीय अंतिम फेरी उद्यापासून येथे सुरू होत असून विजेतेपदाचा करंडक आणि ९० मीटरचे लक्ष्य गाठण्याचा निर्धार पुन्हा एकदा भारताच्या दोन वेळच्या ऑलिंपिक पदकविजेत्या भालाफेकपटू नीरज चोप्राने केला आहे.