VIDEO : असंच नीरज चोप्रा होता येत नाही; कष्ट करावे लागतात | Neeraj Chopra Workout | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Neeraj Chopra Workout Video Gone Viral Boxer Amit Panghal Also Commented

VIDEO : असंच नीरज चोप्रा होता येत नाही; कष्ट करावे लागतात | Neeraj Chopra Workout

Neeraj Chopra Workout Video : भारताचा स्टार भालाफेकपटू नीरज चोप्राने टोकियो ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदक पटकावत अॅथलेटिक्सला भारतात चांगले दिवस आणून दिले. मात्र त्याला दुखापतीमुळे बर्मिंगहम राष्ट्रकुल स्पर्धेत सहभागी होता आले नाही. दुखापतीतून सावरत असलेला नीरज चोप्रा आपल्या फिटनेसवर भरपूर मेहनत घेत आहे. नीरज चोप्राचा असाच एक वर्क आऊट करतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर सध्या तुफान व्हायरल होत आहे.

हेही वाचा: IND vs ZIM : पावसामुळे खेळ खराब होऊ शकतो का? जाणून घ्या

नीरज चोप्रा या व्हिडिओत अवघड मानल्या जाणाऱ्या रस्सा चढाईचा सराव करत आहे. तो उंच लोखंडी पाईपवर फक्त हाताच्या सहाय्याने वर चढताना दिसतो. तसेच तो त्याच लयीत या लोखंडी पाईवरून खाली देखील उतरतो. यावरून त्याच्या हातात किती ताकद आहे याचा अंदाज आपल्याला येतो. दरम्यान, या व्हिडिओवर भारताचा बॉक्सर अमित पांघलने देखील प्रतिक्रिया दिली आहे. तो म्हणतो की पुढच्या वेळी आपण हे वर्क आऊट दोघे मिळून करू.

हेही वाचा: Virat Kohli : 1000 दिवसांपासून 'किंग कोहली' पाहत आहे 'या' क्षणाची वाट

जरी नीरज चोप्रा जोरदार वर्क आऊट करत असला तरी त्याच्या पायाला झालेल्या दुखापतीतून तो पूर्णपणे सावरलाय की नाही याबाबत शंका आहे. 26 ऑगस्टपासून लुसाने डायमंड लीग स्पर्धेत स्पर्धकांच्या यादीत त्याचे नाव आहे. मात्र त्याने अजून या प्रतिष्ठित स्पर्धेत भाग घ्यायचा की नाही याबाबत निर्णय घेतलेला नाही. गेल्या महिन्यात अमेरिकेत वर्ल्ड चॅम्पियनशिप स्पर्धेत ऐतिहासिक रौप्य पदक पटकावल्यानंतर त्याचा मांडीचा स्नायू दुखावला होता. यामुळे 24 वर्षाच्या नीरज चोप्राने बर्मिंगहम राष्ट्रकुल स्पर्धेतून दोन दिवस आधी माघार घेतली. तो बर्मिंगहममध्ये भारताचा राष्ट्रध्वज धारक होता.

सध्या त्याला विश्रांतीचा सल्ला देण्यात आला असून एका सूत्राने दिलेल्या माहितीनुसार नीरज चोप्रा आपल्या दुखापतीतून सावत आहे. दुसरीकडे त्याची टीम लुसाने डायमंड लीग जवळ आल्यानंतर त्यात सहभाग घ्यायचा की नाही याबाबत निर्णय घेईल.