esakal | पहिल्याच एकदिवसीय सामन्यात नेपाळने केला 'हा' लाजिरवाणा विक्रम
sakal

बोलून बातमी शोधा

पहिल्याच एकदिवसीय सामन्यात नेपाळने केला 'हा' लाजिरवाणा विक्रम

पहिल्याच एकदिवसीय सामन्यात नेपाळने केला 'हा' लाजिरवाणा विक्रम

sakal_logo
By
वृत्तसंस्था

अॅमस्टेल्विन : आतंरराष्ट्रीय एकदिवसीय क्रिकेटमध्ये पदार्पण करत नेपाळने बुधवारी (1 ऑगस्ट) नेदरलॅड्सविरुद्ध पहिला एकदिवसीय सामना खेळला. प्रथम फलंदाजी करत नेदरलॅंड्सने नेपाळला 190 धावांचे आव्हान दिले. मात्र या सामन्यात नेपाळला 56 धावांनी पराभव स्वीकारावा लागला. या सामन्यादरम्यान नेपाळने एक लाजिरवाणा विक्रम आपल्या नावावर केला आहे. 

नेदरलॅंड्सने दिलेल्या 190 धावांचा पाठलाग करताना नेपाळचे चार खेळाडू शून्यावर बाद झाले. एकाच डावात चार खेळाडू शून्यावर बाद होण्याचा लाजिरवाणा विक्रम नेपाळने आपल्या नावावर केला. 

प्रथम फलंदाजी करताना नेदरलॅंड्सने मायकल रिप्पन (51) आणि बास डी (31) यांच्या खेळीच्या जोरावर नेदरलॅड्सने 190 धावा उभारल्या. या आव्हानाचा पाठलाग करताना नेपाळचा डाव 134 धावांवर संपुष्टात आला. यामध्ये नेपाळच्या आरिफ शेख, सोमपाल कामी, बसंत रेज्मी आणि करन के सी हे चार फलंदाज शून्यावर बाद झाले. 
 

loading image
go to top