IND vs NED : योगायोग! आधी वडील भिडले, आता मुलगा भारताविरूद्ध थोपटणार दंड | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

India Vs Netherland Tim Pringle Chris Pringle

IND vs NED : योगायोग! आधी वडील भिडले, आता मुलगा भारताविरूद्ध थोपटणार दंड

India Vs Netherland Tim Pringle Chris Pringle : भारताने ऑस्ट्रेलियात होत असलेल्या टी 20 वर्ल्डकपमध्ये पहिल्या सामन्यात पाकिस्तानला 4 विकेट्सनी मात दिली. आज (दि 27) भारत तुलनेने दुबळ्या नेदरलँडविरूद्ध सुपर 12 मधील आपला दुसरा सामना खेळणार आहे. जरी नेदरलँड कागदावर दुबळी वाटत असली तरी टीम इंडिया कोणत्याही संघाला हलक्यात घेण्याच्या मूडमध्ये नाहीये. दरम्यान, आजच्या सामन्यात एक अजब योगायोग निर्माण झाला आहे. नेदलँडचा डावखुरा फिरकीपटू टिम प्रिंगल जर आजच्या भारताविरूद्धच्या सामन्यात खेळला तर वडील आणि मुलगा वर्ल्डकपमध्ये एकाच संघाविरूद्ध मैदानात उतरण्याचा एक योगायोग जुळून येईल.

हेही वाचा: T20 World Cup : Rilee Rossouw ऐतिहासिक शतक, ठोकल्या 15 चेंडूत 76 धावा

टिम प्रिंगलचे वडील ख्रिस प्रिंगल हे 1996 च्या वर्ल्डकपमध्ये भारताविरूद्ध खेळले होते. त्यावेळी ते न्यूझीलंड संघाकडून खेळायचे. वर्ल्डकपमध्ये तिसऱ्या सामन्यात भारत आणि न्यूझीलंड एकमेकांना भिडले होते. या सामन्यात सचिन तेंडूलकरने 136 चेंडूत 115 धावांची शतकी खेळी केली होती. यात 9 चौकार आणि 3 षटकारांचा समावेश होता. सचिन तेंडुलकर आणि ख्रिस प्रिंगल हे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 5 वेळा समोरासमोर आले होते. यामध्ये सचिनने एका शतकासह प्रिंगलला एकूण 315 धावा ठोकल्या होत्या.

हेही वाचा: Virat Kohli : सदगुरुंनी केलं विराटचं कौतूक, त्याच्यात एक गोष्ट खास! ती म्हणजे...

तेंडुलकरने 1996 च्या वर्ल्डकमध्ये ज्या ख्रिस प्रिंगलला ठोकले होते त्याचा मुलगा आज भारताविरूद्ध खेळणार वर्ल्डकपच्या सामन्यात खेळण्याची शक्यता आहे. फरक फक्त इतकाच आहे की ख्रिस प्रिंगल हा न्यूझीलंडकडून खेळला होता. मात्र आता त्याचा मुलगा टिम प्रिंगल हा नेदरलँडकडून खेळत आहे. टिम प्रिंगल 19 वर्षाखालील न्यूझीलंड संघाकडून खेळला आहे. विशेष म्हणजे टिमचे वडील ख्रिस प्रिंगल देखील काही काळानंतर नेदरलँडकडून खेळले आहे. ख्रिसने आपल्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दित एकूण 14 कसोटी आणि 64 वनडे सामने खेळले आहेत. यात त्याने 30 कसोटी विकेट्स आणि 103 वनडे विकेट्स घेतल्या आहेत.