नवीन प्रशिक्षकांचा कार्यकाळ फक्त दोनच वर्षांचा, जाणून घ्या कारण...

वृत्तसंस्था
Friday, 16 August 2019

भारतीय संघाच्या प्रशिक्षकपदी कोणाचा नंबर लागणार याचा निकाल आज लागणार आहे. आज प्रशिक्षक म्हणून निवड होणाऱ्यांचा कार्यकाळ हा केवळ 2021 पर्यंतच असणार आहे. 2021मध्ये होणाऱ्या ट्वेंटी20 विश्वकरंडकानंतर पुन्हा नव्याने प्रशिक्षक निवडची प्रक्रिया घेतली जाणार आहे. 

मुंबई : भारतीय संघाच्या प्रशिक्षकपदी कोणाचा नंबर लागणार याचा निकाल आज लागणार आहे. आज प्रशिक्षक म्हणून निवड होणाऱ्यांचा कार्यकाळ हा केवळ 2021 पर्यंतच असणार आहे. 2021मध्ये होणाऱ्या ट्वेंटी20 विश्वकरंडकानंतर पुन्हा नव्याने प्रशिक्षक निवडची प्रक्रिया घेतली जाणार आहे. 

मुख्य प्रशिक्षकाचा कार्यकाळ 2021च्या ट्वेंटी20 वर्ल्ड कप स्पर्धेपर्यंत असणार आहे आणि त्यानंतर पुन्हा मुख्य प्रशिक्षक निवडीची पुन्हा प्रक्रिया पार पडेल. यासह सपोर्ट स्टाफलाही ट्वेंटी20 वर्ल्ड कपपर्यंतच करार देण्यात येणार आहे. त्यानंतर पुढील महत्त्वांच्या स्पर्धा लक्षात घेता, नव्यानं मुलाखती होतील

बीसीसीआयच्या प्रशासकीय समितीने विद्यमान मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांच्यासह सहा जणांची नावे मुलाखतीसाठी निश्‍चित केली आहेत. त्यांच्यासह माईक हेसन, टॉम मुडी, रॉबिन सिंग, लालचंद राजपूत, फिल सिमन्स यांना तारीख व वेळ कळविण्यात आली आहे. यात टाइम झोनमुळे शास्त्रींची मुलाखत सर्वांत शेवटी होईल. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: NEw coaches will be with team India only till 2021