एजाज पटेलच्या विश्वविक्रमी कामगिरीत कॅप्टन लॅथमचा मोठा हातभार

एजाज पटेलनं केलेल्या कामगिरीमागे जेवढे त्याचे कष्ट महत्वाचे तेवढीच त्याचा कर्णधार टॉम लॅथमची भूमिकाही महत्त्वपूर्ण अशी राहिली
Test Cricket World Record
Test Cricket World Record Sakal

India vs New Zealand, 2nd Test Wankhede Stadium, Mumbai : एजाज पटेलने (Ajaz Patel ) मुंबईतील वानखेडे कसोटीत एका डावात 10 विकेट घेण्याच्या विश्वविक्रमाशी बरोबरी केली. अशी कामगिरी करणारा क्रिकेट इतिहातील तो तिसरा गोलंदाज ठरला. विशेष म्हणजे एका डावात 10 विकेट घेण्याचा विश्वविक्रम करणारे हे तिघेही फिरकीपटूच आहेत. एजाज पटेलने (Ajaz Patel) एका डावात 10 विकेट घेतल्या आणि लॅकर, अनिल कुंबळे यांच्या विश्वविक्रमाशी बरोबरी केली याचे कौतुक सर्व क्रिकेट प्रेमींना असणे स्वाभाविकच आहे. विशेष गोष्ट म्हणजे एजाज पटेलने ही कामगिरी फिरकीचे माहेरघर समजल्या जाणाऱ्या भारतात केली. तीही भारताविरुद्धच! त्यामुळे एजाज पटेलच्या या स्पेलला क्रिकेटच्या इतिहासात एक विशेष स्थान असणार हे नक्की.

एजाजच्या यशात टॉम लॅथम कसा ठरला वाटेकरी?

वानखेडेच्या मैदानात एजाज पटेलनं केलेल्या कामगिरीमागे जेवढे त्याचे कष्ट महत्वाचे आहेत तेवढीच त्याचा कर्णधार टॉम लॅथमची (Tom Latham) भूमिकाही महत्त्वाची आहे. आता टॉम लॅथम हा तर फलंदाज, त्यातही केन विल्यमसन दुखापतग्रस्त झाल्यामुळे आयत्यावेळी त्याच्या गळ्यात नेतृत्वाची माळ पडली. मग एजाजच्या कामगिरीत टॉम लॅथमचा कसाकाय वाटा असू शकतो? असा प्रश्न एखाद्याला पडणं स्वाभाविक आहे.

Test Cricket World Record
Video : दांड्या कधी उडल्या कळलं नाही, अन् अश्विननं घेतला रिव्ह्यू

एजाज एक चांगला डावखुरा फिरकी गोलंदाज आहे यात शंका नाही. मात्र अशा चांगल्या गोलंदाजाला आपल्या गोलंदजीवर डोळे झाकून विश्वास ठेवणारा कर्णधारही लागतो. असा कर्णधार एजाज पटेलला एका सामन्यासाठी का असेना लाभला. हा कर्णधार म्हणजे टॉम लॅथम. टॉम लॅथमने (Tom Latham) वानखेडे स्टेडियमवरील खेळपट्टीचा नूर ओळखून आपल्या विकेट काढून देणाऱ्या गोलंदाजाकडे बिनदिक्कत चेंडू सोपवला. त्याने एका बाजूने एजाज पटेलची गोलंदाजी सुरुच ठेवली. टॉम लॅथमने ओळखले होते की वानखेडेची खेळपट्टी ( Wankhede Stadium ) ही पहिल्या दिवसापासूनच फिरकीला साथ देत आहे. ( 10 wickets in inning )

टॉम लॅथमने सौरभ गांगुलीचा कित्ता कसा गिरवला?

लॅथमनं एजाजकडून जास्तीजास्त षटके टाकून घेतली. न्यूझीलंडने पहिल्या डावात जवळपास 110 षटके टाकली. त्यातील तब्बल 48 षटके ही एकट्या एजाज पटेलनेच टाकली. सहसा इंग्लंड, साऊथ आफ्रिका, ऑस्ट्रलिया न्यूझीलंड यांच्यासारख्या वेगवान गोलंदाजांची खाण असलेले देश गोलंदाजीत वेगवान गोलंदाजांना विशेष महत्व देतात. जरी ते भारताचा दौरा करत असले तरी ते आपल्या फिरकीवर फारसा भर देत नाहीत. फिरकीपटूच्या हातात नवा चेंडू देण्याचे धाडस फार थोडे कर्णधार दाखवतात. या सर्व पार्श्वभूमीवर टॉम लॅथमने (Tom Latham) एजाज पटेलवर दाखवलेला विश्वास हा देखील एजाज पटेलच्या विश्वविक्रमात मोलाचा वाटेकरी ठरतो. जर टॉम लॅथमही इतर कर्णधारांसारखा विचार करत असता तर त्याने एजाज पटेलला गोलंदाजीचा इतका फ्री हँड दिला नसता. जर एजाजला 110 षटकापैकी 48 षटके टाकण्याची संधी मिळाली नसती तर एजाज एका डावात 10 विकेट घेण्याचा विश्वविक्रम करु शकला नसता. असा गोलंदाजीचा फ्री हँड हा सौरभ गांगुली ( Sourav Ganguly ) अनिल कुंबळेला देत होता. कुंबळेंच्या विक्रमी कामगिरीवेळी संघाचा कर्णधार मोहम्मद अझरुद्दीन असला तरी त्यानंतरच्या काळात गांगुलीने अनिल कुंबळे ( Anil Kumbe ) याच्याकडून अधिक षटके टाकून घेतल्याचे पाहायला मिळाले आहे. मोहम्मद अझरुद्दीनच्या नेतृत्वाखालीही 1999 मध्ये दिल्लीच्या मैदानात रंगलेल्या पाक विरुद्धच्या सामन्यात अनिल कुंबळे यांनी 60 षटकापैकी 27 षटके एकट्याने टाकली होती.

Test Cricket World Record
न्यूझीलंडच्या एजाजचं शरद पवारांकडून कौतुक, म्हणाले..

एजाज पटेल - टॉम लॅथमनं घालून दिला आदर्श

एजाज पटेल (Ajaz Patel) आणि टॉम लॅथम यांनी भारत दौरा करणाऱ्या भारतीय उपखंडाबाहेरील संघांना एक आदर्श घालून दिला आहे. आता भारतीय उपखंडाबाहेरील संघाचे कर्णधार निदान भारतात तरी त्यांच्या संघातील फिरकीपटूंवर जास्त फोकस करतील. तसेही आयपीएलमुळे अनेक उपखंडाबाहेरील खेळाडू सातत्याने भारतात खेळत आहेत. त्यामुळे भारतात खेळताना फिरकीपटू किती महत्वाचा रोल पार पाडू शकतात हे त्यांना हळूहळू उमगू लागले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com