VIDEO : एका ओव्हरमध्ये दोनदा LBW; त्यानंतर कुटल्या नाबाद 186 धावा

New Zealand vs Bangladesh 2nd Test Tom Latham
New Zealand vs Bangladesh 2nd Test Tom Latham Sakal

New Zealand vs Bangladesh 2nd Test :घरच्या मैदानावर पहिला कसोटी सामना गमावलेल्या न्यूझीलंडने बागंलादेश () विरुद्ध दमदार कमबॅक केले. दुसऱ्या कसोटी सामन्यातील पहिल्या दिवशी न्यूझीलंडने 1 विकेट गमावून 349 धावा केल्या होत्या. केन विल्यमसनच्या (Ken Williamson) अनुपस्थितीत संघाचे नेतृत्व करणारा टॉम (Tom Latham )लॅथम दिवसाअखेर नाबाद 186 धावांवर खेळत होता. दुसऱ्या बाजूला ड्वेन कॉन्वे (Devon Conway) 99 धावांवर नाबाद होता. सलामीवीर विल यंगने 114 चेंडूत 54 धावांची खेळी करत कर्णधारासोबत पहिल्या विकेटसाठी 148 धावांची तगडी भागीदारी रचली. (Tom Latham has been given OUT LBW 2 time In One Over successful reviews)

टॉम लॅथम एकाच षटकात दोन वेळा LBW, पण...

न्यूझीलंड आणि बांगलादेश (New Zealand vs Bangladesh) यांच्यातील दुसऱ्या सामन्यात कर्णधार टॉम लॅथम द्विशतकाच्या दिशेनं वाटचाल करत आहे. पण डावातील 9 व्या षटकात मैदानातील पंचाने त्याला दोनवेळा LBW स्वरुपात आउट दिले. या षटकातील दुसऱ्या चेंडूवर बांगलादेशच्या हुसैन (Ebadot Hossain) याने जोरदार अपील केली आणि अंपायरने त्याला बाद ठरवले. त्याने रिव्ह्यू घेतला आणि अंपायरला आपला निर्णय मागे घ्यावा लागला. (Tom Latham successful reviews ) याच षटकात पुन्हा याच घटनेचा रिप्ले दाखवावा असे चित्र पाहायला मिळाले. रिझल्ट पुन्हा सेम टू सेम आला. एकाच षटकात दोन वेळा LBW दिल्यानंतर यशस्वी रिव्ह्युवनं टॉम लॅथमन विकेट वाचवली. एवढेच नाहीतर पहिला दिवसही त्याने गाजवला. 278 चेंडूत त्याने नाबाद 186 धावा केल्या. कॉन्वेच्या साथीनं त्याने दुसऱ्या विकेटसाठी 201 धांवाची भागीदारी करत बांगलादेशच्या गोलंदाजांचे खांदे पाडले.

New Zealand vs Bangladesh 2nd Test Tom Latham
Cape Town Test Record : विराट-पुजारापेक्षाही अश्विन भारी!

कॉन्वे शतकाच्या उंबरठ्यावर...

इंग्लंडविरुद्ध पदार्पणात द्विशतकी खेळी करणारा कॉन्वे तिसऱ्या कसोटी शतकाजवळ पोहचलाय. दुसऱ्या दिवशी तो शतक साजरे करुन पुन्हा एक मोठी खेळी साकारण्याच्या दिशेने वाटचाल करताना दिसेल. त्याने बांगलादेश विरुद्धच्या कसोटी मालिकेतील पहिल्या सामन्यातही 122 धावांची दमदार खेळी केली होती. पण पाहुण्या बांगलादेशनं हा सामना 8 विकेट्सनी जिंकत मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली होती. कॉन्वेचं शतक व्यर्थ ठरलं होतं.

New Zealand vs Bangladesh 2nd Test Tom Latham
AUS vs ENG : गारठलेल्या इंग्लंडला सलामीवीराच्या अर्धशतकाची 'ऊब'

टॉम लॅथमची आतापर्यंतची कसोटीतील कामगिरी

टॉम लॅथमनं न्यूझीलंडकडून आतापर्यंत 63 कसोटी सामने खेळले आहेत. 110 डावात त्याने 42.50 च्या सरासरीनं 4400 पेक्षा अधिक धावा केल्या आहेत. यात 22 अर्धशतक, 12 शतक आणि एका द्विशतकाचा समावेश आहे. बांगलादेश विरुद्धच्या सामन्यात त्याला दुसरे द्विशतक खुणावत आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com